‘बर्थ डे गर्ल’ कंगना राणौतने मनालीतील बंगल्यात लावलीत ३१ झाडे! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 04:38 AM2018-03-23T04:38:38+5:302018-03-23T10:08:38+5:30

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आज (२३ मार्च) आपला ३१ वा वाढदिवस साजरा करतेय. आजचा दिवस कंगनासाठी निश्चितपणे खास आहे. ...

'Birth Day Girl' Kangana Ranaut has 31 trees planted in the Manali bungalow! Look, photos !! | ‘बर्थ डे गर्ल’ कंगना राणौतने मनालीतील बंगल्यात लावलीत ३१ झाडे! पाहा, फोटो!!

‘बर्थ डे गर्ल’ कंगना राणौतने मनालीतील बंगल्यात लावलीत ३१ झाडे! पाहा, फोटो!!

googlenewsNext
लिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आज (२३ मार्च) आपला ३१ वा वाढदिवस साजरा करतेय. आजचा दिवस कंगनासाठी निश्चितपणे खास आहे. खरे तर कंगना काहीशी रिजर्व स्वभावाची आहे. पण यंदाचा आपला वाढदिवस तिला धूमधडाक्यात साजरा करायचा होता. मात्र श्रीदेवी यांच्या निधनामुळे तिने हा प्लान रद्द करत, आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज वाढदिवशी कंगना मनालीत आहे आणि आजचा अख्खा दिवस कुटुंबासोबत घालवणार आहे.



३१ व्या वाढदिवसानिमित्त कंगनाने आपल्या मनालीतील नव्या बंगल्यात ३१ झाडे लावलीत. यात किवी, चेरी अशा फळझाडांचा समावेश आहे. कंगनाला गार्डनिंग प्रचंड आवडते.



ALSO READ : Cdr case :​ हृतिक रोशनचा नंबर शेअर केल्याच्या आरोपाने संतापली कंगना राणौत ! असा केला खुलासा!!

लहानपणी आईला गार्डनिंग करताना पाहून तिलाही हा छंद जडला. याशिवाय सध्या कंगना पियानो शिकते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरिसपर्यंत कंगना आपल्या नव्या बंगल्यात कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. यानंतर ती मुंबईत परतून ‘मेंट है क्या’ या चित्रपटाचे शूटींग सुरू करेल.
नुकताच कंगनाने मनालीतील आपल्या अलिशान नव्या बंगल्यात गृहप्रवेश केलायं. काही दिवसांपूर्वी तिच्या या नव्या घरात गृहप्रवेशाची पूजा झाली. यावेळी कंगनाचे संपूर्ण कुटुंब व मित्र उपस्थित होते. १० कोटी मोजून कंगनाने या बंगल्यासाठी जागा खरेदी केली आणि २० कोटी खर्चून हा अलिशान बंगला बांधला, असे कळते. 
तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. काल-परवा कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात कंगनाचे नाव समोर आले. या प्रकरणात अटक करण्यात आलेला वकील रिजवान सिद्दीकी याला कंगनाने हृतिक रोशन याचा नंबर दिला होताए असे उघड झाले आहे.  हृतिकचा सीडीआर मिळवण्यासाठी कंगणाने हा नंबर रिजवानला दिला होता का, याचा तूर्तास पोलिस तपास करत आहेत. 

Web Title: 'Birth Day Girl' Kangana Ranaut has 31 trees planted in the Manali bungalow! Look, photos !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.