या दाक्षिणात्य सुपरस्टारने विकत घेतली सलमान व शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 08:53 PM2019-07-05T20:53:50+5:302019-07-05T20:54:19+5:30

कलाकारांना शूटिंगच्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅनची गरज भासते.

Allu Arjun new Vanity Van is too much costly | या दाक्षिणात्य सुपरस्टारने विकत घेतली सलमान व शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन, पहा फोटो

या दाक्षिणात्य सुपरस्टारने विकत घेतली सलमान व शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन, पहा फोटो

googlenewsNext

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा एक लक्झरी कार उभ्या असतात. मात्र आता त्याच्या गॅरेजची शोभा वाढवण्यासाठी आणखीन एक गाडीची भर पडली आहे. ही गाडी म्हणजे त्याची व्हॅनिटी व्हॅन. खरेतर कलाकारांना व्हॅनिटी व्हॅनची आवश्यकता भासते. कारण ते शूटिंगच्या वेळी खूप व्यग्र असतात आणि त्यांचा जास्तीत जास्त वेळ शूटिंग लोकेशनवर व्यतित होतो. त्यामुळे त्यांना आराम करण्यासाठी किंवा महत्त्वाचे काम करण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची गरज पडते. अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन रेग्युलर व्हॅनिटी व्हॅनपेक्षा खूप वेगळी आहे. त्याने ती कस्टमाइज्ड व डिझाईन करून घेतली आहे.


अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हॅनिटी व्हॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

अल्लू अर्जुनच्या या व्हॅनिटी व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहेत. तसेच या व्हॅनवर  ‘AA’ असा लोगोदेखील पहायला मिळतोय. या व्हॅनचा रंग काळा असून आतदेखील काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनचे व्हॅनसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचं तर तो आगामी चित्रपट एए१९च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत मोहेंजोदारो फेम अभिनेत्री पूजा हेगडेदेखील झळकणार आहे.

अल्लु अर्जुन ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन चित्रीकरणास पोहोचतो. तेव्हा पासून त्याच्या या गाडीची चर्चा सुरु झाली आहे. 

Web Title: Allu Arjun new Vanity Van is too much costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.