ठळक मुद्देइमरानसोबत काम करण्याचा अमिताभ यांचा निर्णय ऐश्वर्याला आवडलेला नाहीये. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात इमरानने हजेरी लावली होती. त्याने या कार्यक्रमात एका प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्याला प्लास्टिक म्हटले होते.

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्यावर चिडली असून हे कारण काही घरगुती नाहीये. तर अमिताभ यांच्या एका आगामी चित्रपटामुळे ऐश्वर्या राय बच्चनला तिच्या सासऱ्यांचा राग आला आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला त्यांनी नुकतीच सुरुवात देखील केली आहे. याच चित्रपटावरून ऐश्वर्याला अमिताभ यांचा राग आला असल्याचे वृत्त पिंकव्हिलाने दिले आहे.

पिंकव्हिलाने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, चेहरे या चित्रपटाद्वारे अमिताभ आणि इमरान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटात एकमेकांसोबत काम करण्यास ते दोघे प्रचंड उत्सुक आहेत. पण इमरानसोबत काम करण्याचा अमिताभ यांचा निर्णय ऐश्वर्याला आवडलेला नाहीये. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात इमरानने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो महेश भट्ट यांच्यासोबत झळकला होता. या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये दिलेल्या एका उत्तरामुळे ऐश्वर्याला इमरानचा राग आला होता. त्याने एका प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्याला प्लास्टिक म्हटले होते. ही कमेंट ऐश्वर्याला रुचली नव्हती. तिने कॉफी विथ करणच्या या भागानंतर दिलेल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुझ्याबद्दल ऐकलेली कोणती कमेंटच्या तुझ्या अद्याप लक्षात आहे त्यावर तिने फेक आणि प्लास्टिक असे उत्तर दिले होते. तेव्हापासूनच तिचे इमरानबद्दलचे मत चांगले नव्हते आणि त्याचमुळे अमिताभ यांनी इमरानसोबत काम करण्यास होकार दिल्याचे ऐश्वर्याला पटलेले नाहीये. 

'चेहरे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये निर्माते आनंद पंडित, अभिनेता इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी म्हटले होते की, 'बऱ्याच कालावधीपासूनचे कमिटमेंट आज पूर्ण झाले. या पोस्टसोबत त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील सांगितली आहे.'

'चेहरे' हा सिनेमा २१ फेब्रुवारी, २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्रिती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, अन्नू कपूर व रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


Web Title: Aishwarya Rai Bachchan upset with father in law Amitabh Bachchan for working with Emraan Hashmi?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.