After sister Priyanka Chopra, Parineeti Chopra to release her first music video 'Mujhe Tum Nazar Se' | प्रियंकापाठोपाठ परिणीती चोप्रानेही कसली कंबर! लवकरच येणार पहिला ‘म्युझिक व्हिडीओ’!!
प्रियंकापाठोपाठ परिणीती चोप्रानेही कसली कंबर! लवकरच येणार पहिला ‘म्युझिक व्हिडीओ’!!

ठळक मुद्देतूर्तास बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे बायोपिक आणि ‘भूज- द प्राईड आॅफ इंडिया’ या चित्रपटांत परिणीती बिझी आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सन २०१२ मध्ये आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली. प्रियंकाने गायलेले ‘इन माई सिटी’ हे गाणे जगभर लोकप्रिय झाले आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता प्रियंकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा ही सुद्धा तिच्या पावलांवर पाऊल टाकत स्वत:चा ‘सिंगल म्युझिक व्हिडीओ’ लॉन्च करणार आहे.
२०१७ मध्ये प्रदर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटातील ‘माना के हम यार नहीं’ हे गाणे परिणीतीने गायले होते. तिच्या आवाजातील हे गाणे लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता आणखी एक पाऊल टाकत परीने सिंगल म्युझिक व्हिडीओ लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. मेहंदी हसन यांचे ‘मुझे तुम नजर से...’ हे क्लासिक सॉन्ग परिणीतीच्या आवाजात एका नव्या रूपात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. पुढील महिन्यात परिणीती या म्युझिक व्हिडीओचे शूटींग सुरु करेल.


टी-सीरिजचे भूषण कुमार हा व्हिडीओ प्रोड्यूस करणार असून अमाल मलिक हे गाणे नव्याने कम्पोज करणार आहे. मनोज मुंतशीर यांनी या रिमिक्स व्हर्जनचे बोल लिहिले आहेत. यापूर्वी मनोज मुंतशीर यांनी ‘सानू एक पल’ आणि ‘मेरे रश्के कमर’च्या रिमिक्स व्हर्जनला शब्दसाज चढवला होता.


तूर्तास बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे बायोपिक आणि ‘भूज- द प्राईड आॅफ इंडिया’ या चित्रपटांत परिणीती बिझी आहे. ‘जबरियां जोडी’ या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.

English summary :
Parineeti Chopra will soon be launching her own Single Music Video. Parineeti will soon sing Mehendi Hassan's 'Mujhe Tum Nazar Se ...' song . Next month, Parineet will start shooting for this music video.


Web Title: After sister Priyanka Chopra, Parineeti Chopra to release her first music video 'Mujhe Tum Nazar Se'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.