त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 12:05 PM2018-07-24T12:05:02+5:302018-07-24T12:09:46+5:30

आपल्या कुटुंबाविषयी, खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या सर्व चर्चा पाहून अभिषेकने ट्विट करून काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

Abhishek Bachchan's first disclosure about that video | त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा

त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा

ठळक मुद्देलंडनमध्ये बच्चन कुटुंबीय सुट्टीसाठी गेले होते.अभिषेक व ऐश्वर्या यांच्यातील मतभेदांच्या चर्चांनी धरला होता जोर

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्यामधील मतभेदाचे वृत्त ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेकने चुकीचे असल्याचे सांगितले आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या सुट्टीवरून परतत असताना त्यांच्यातील वाद पाहायला मिळाल्याचे म्हटले गेले. पण, आपल्या कुटुंबाविषयी, खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता अभिषेकने एक ट्विट करत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 


प्रसार माध्यमांना उद्देशून अभिषेकने ट्विट केले की, मी तुम्हा सर्वांचाच आदर करतो आणि म्हणूनच विनंती करतो की कृपया चुकीच्या बातम्या देणे थांबवा. तुम्हाला सतत काहीतरी प्रसिद्ध करण्याची गरज असते हे मी जाणतो. पण त्यातही काहीतरी तथ्य असले पाहिजे. अभिषेकने हे ट्विट एका पोर्टलच्या बातमीच्या ट्विटमुळे केले होते. पण, कालांतराने त्या पोर्टलकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले.
सोशल मीडियालवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या सर्व चर्चांना उधाण आले होते. ज्यामध्ये सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर मुंबईत परतत असताना ऐश्वर्या आणि अभिषेकमधील मतभेद दिसून आला होता. विमानतळावर किंवा कोणत्याही ठिकाणी नेहमी ही जोडी अगदी आनंदात माध्यमांसमोर येते. पण, यावेळी मात्र आराध्या ऐश्वर्याची साथ सोडण्यास तयार नव्हती आणि अभिषेक त्यांच्या पुढे एकटाच चालत येताना दिसला. त्यांच्या चेहऱ्यांवर वेगळेच भाव असल्यामुळे नेमके त्यांच्यात झालंय तरी काय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला. लंडनमध्ये बच्चन कुटुंबीय सुट्टीसाठी गेले होते. पण, त्यानंतर त्यांच्यातील मतभेदांच्याच चर्चांनी जोर धरला होता. अभिषेक बच्चनचे ट्विट पाहिल्यानंतर त्या दोघांच्या नात्यात मतभेद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या दोघांचे चाहते खूश झाले आहेत. 

Web Title: Abhishek Bachchan's first disclosure about that video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.