लाइव न्यूज़
 • 11:03 AM

  नवी दिल्ली- राज्यसभा निवडणुकीसाठी नोटाचा वापर करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

 • 10:49 AM

  जम्मू-काश्मीर : कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी.

 • 10:40 AM

  #Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्माला कांस्य

 • 10:39 AM

  #Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला दोन पदक निश्चित. सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा अव्वल तिघांत

 • 10:30 AM

  जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमध्ये प्रवासी बस नदीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

 • 10:14 AM

  यवतमाळ : राज्यातील दीड हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा, नगरपंचायतीत समायोजनाचा मार्ग मोकळा

 • 09:59 AM

  #Women’s volleyball भारतीय महिला संघाचे स्थान धोक्यात. ब गटात व्हिएतनामकडून 3-0 असा पराभव.

 • 09:57 AM

  गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

 • 09:43 AM

  सोलापूर : खडकवासला धरणातून १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

 • 09:20 AM

  अहमदनगर : घारगाव परिसरात भूकंप सदृश्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

 • 09:15 AM

  भंडारा : जिल्ह्यात २४ तासांत ११३.८ मिमी पाऊस, लाखनी तालुक्यात सर्वाधिक १८५ मिमी पावसाची नोंद

 • 09:02 AM

  #Shooting सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी 10 मीटर एअर पिस्तुल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत सौरभने सहा राऊंडमध्ये 99, 99, 93, 98, 98 आणि 99 अशा एकूण 586 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले, तर अभिषेकने 580 गुणांसह सहावे स्थान घेतले.

 • 09:01 AM

  भंडारा : जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, जवाहरनगरजवळ पुरात ३५ जण अडकले, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना

 • 09:00 AM

  भंडारा : जोरदार पावसामुळे घर कोसळून तिघांचा मृत्यू, लाखनी तालुक्याच्या राजेदहेगाव येथील घटना

 • 08:58 AM

  नांदेड : उमरी तालुक्यातील बळेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे 16 दरवाजे उघडले, बंधाऱ्याखालील सर्व गावांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

All post in लाइव न्यूज़