लाइव न्यूज़
 • 12:34 PM

  कर्नाटक: विधानसभा अध्यक्षपदी रमेश कुमार यांची निवड

 • 12:25 PM

  नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना कोर्टाचे आदेश. दुपारी तीन वाजेपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश. अनधिकृत बांधकामावरील कारवाईवर कोर्टाची कारणे दाखवा नोटीस.

 • 12:10 PM

  इंधन दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन.

 • 11:46 AM

  कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांची नियुक्ती. ताराराणी आघाडीच्या रूपराणी निकम यांचा केला पराभव.

 • 11:35 AM

  रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात बॉम्बसदृश बॉक्स सापडल्याने खळबळ. यंत्रणेची धावपळ सुरू.

 • 11:19 AM

  बोधगया स्फोट : प्रकरणातील पाचही आरोपींना पाटणा कोर्टाने ठरविलं दोषी. पुढील सुनावणी 31 मे रोजी.

 • 11:11 AM

  औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून शासकीय रुग्णालय घाटीची पाहणी सुरु.

 • 11:06 AM

  उन्नाव बलात्कार प्रकरण- भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर व शशी सिंह या दोघांना कोर्टात केलं हजर. 8 जून रोजी प्रकरणावर होणार पुढील सुनावणी.

 • 10:35 AM

  यवतमाळ : महागाव तालुक्याच्या धनोडा येथील पेट्रोलपंपावर ५५ हजाराची चोरी. चोरट्यांनी कर्मचाऱ्याच्या उशीखालील चावी काढून पळविले पैसे.

 • 10:28 AM

  नागपूर- हॉटेल बैठकीत रात्री अज्ञात 7 ते 8 तरुणांची तोडफोड

 • 10:23 AM

  कॅनडात भारतीय रेस्टॉरन्टमध्ये भीषण स्फोट. 15 जण जखमी झाल्याची माहिती.

 • 10:17 AM

  मुंबई- शिक्षक मतदारसंघ निवडणूक, निवडणुकीला गैरहजर राहिल्यास शिक्षकांवर फौजदारी कारवाई होणार- निवडणूक आयोग

 • 10:15 AM

  नाशिक- मनपातल्या 22 अधिका-यांच्या बदल्या, राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंग कारवाई होणार- तुकाराम मुंढे

 • 10:04 AM

  यवतमाळ : शहरातील धामणगाव मार्गावरील मटका अड्ड्यावर अमरावती सीआयडी पथकाची धाड, गुरुवारी रात्री 11 वाजता रोख रकमेसह आठ जणांना घेतले ताब्यात.

 • 09:00 AM

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 27 मे रोजी कुरुक्षेत्रच्या दौऱ्यावर.

All post in लाइव न्यूज़

सिंह

आज

२५ मे २०१८

आठवड्याचे भविष्य

मुळातच रुबाबदार व्यक्तिमत्त्ववाले आपण या आठवडय़ात अधिक कार्यप्रवण व्हाल. आपल्या बुद्धीला उत्तम खाद्य मिळेल. योजलेली कामे पूर्ण होतील. सरकारी नोकरवर्गाचा शासन दरबारी मानसन्मान. शेअर्स, लॉटरीसारख्या व्यवहारातून अधिक फायदे संभवतात. पण आर्थिक व्यवहारात सतर्कता हवी. वाहन योग जुळून येईल. उच्च शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांत असलेल्या  विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याचा योग. मात्र नातेवाईकांचा त्रस संभवतो. कटू बोलून कोणाला दुखवू नका. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. अकल्पितपणे आर्थिक लाभ होतील. पण प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. तरुणवर्गाला विवाहयोग चांगले आहेत.
शुभदिनांक 22,23
 

मासिक भविष्य

हा महिना आपल्या आर्थिक उत्कर्षाचा आहे. आपली आर्थिक बाजू बळकट करणा:या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.स्वकष्टाचा पैसा मिळेल. तसाच खर्चही वाढेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुसंधी लाभतील. महत्वाचे निर्णय घेतले जातील. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. संसर्गजन्य विकार यांपासून त्रस होण्याची शक्यता राहाते. विरोधकांचा त्रस जाणवेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी येईल.  सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. शुक्रामुळे नोकरीत बढती मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणा:या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. संततीचा उत्कर्ष होईल. कल्पनाशक्तीला वाव देणा:या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. आशावादी धोरण स्वीकारणो फायदेशीर राहील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात  सफलता लाभेल. प्रय}ांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.

प्रमोटेड बातम्या