महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला ८ जागी फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:05 AM2019-05-24T05:05:11+5:302019-05-24T05:45:47+5:30

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अवघ्या एका जागेवर समाधान तर मानावे लागले आहेच;

Defected Bahujan Congress (NCP) combine in 8 seats | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला ८ जागी फटका

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला ८ जागी फटका

Next

- रवी टाले
अकोला: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अवघ्या एका जागेवर समाधान तर मानावे लागले आहेच; परंतु निकालांवर फार मोठा परिणाम करण्यातही आघाडी अपयशी ठरली आहे. सायंकाळी सहा वाजतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या केवळ आठ उमेदवारांना फटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय जरी मिळवू शकले नाहीत, तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे संपुआ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात धक्का बसेल, हा कयास धुळीस मिळाला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी ४३ मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी, पाच जागांवर संपुआ, एका जागेवर वंचित बहुजन आघाडीे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर होता. नऊ मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते नगण्य आहेत. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी केवळ नऊ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहा आकडी मते मिळवू शकले. या कामगिरीमुळे विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्याच्या अ‍ॅड. आंबेडकरांच्या घोषणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
>‘वंचित’ची कामगिरी
वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरअकोला व सोलापूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभूत झाले आहेत. ते अकोल्यात दुसऱ्या, तर सोलापुरात तिसºया क्रमांकावर राहिले.
बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, हातकणंगले, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ-वाशिम या आठच मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने विजयी मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभव चाखावा लागला. त्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनाही हार पत्करावी लागली.
( संपादक)

Web Title: Defected Bahujan Congress (NCP) combine in 8 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.