अकोल्यात नव्या विक्रमाची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:39 AM2019-04-17T04:39:35+5:302019-04-17T04:40:09+5:30

अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे.

Akolatan set new record | अकोल्यात नव्या विक्रमाची लढत

अकोल्यात नव्या विक्रमाची लढत

Next

अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे. धोत्रे यांनी विजय मिळविला, तर अकोल्यातून सलग चौथ्यांदा जिंकणारे ते पहिलेच ठरतील. आंबेडकर जिंकले, तर काँग्रेससोबत आघाडी न करता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झाले, तर तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल.
>विकास, राष्टÑवाद अन् सक्षम नेतृत्व
भाजपचे उमेदवार संजय धोत्रे हे सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत, त्यामुळे केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला. पुलवामा घटना, बालाकोटवरील हल्ला या मुद्द्यांना प्रचारात स्थान देऊन राष्टÑवाद जागृत करण्याचा, तसेच देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन, मोंदीचेच नेतृत्व सक्षम असल्याचे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रचारात करण्यात आल्या.
>सरकारचे अपयश; मोदी नकोच !
काँग्रसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी मोदी सरकारच्या योजनांचे अपयश, पूर्तता न झालेली आश्वासने, देशातील सामाजिक एकता धोक्यात अशा मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला. मोदी विरोधात आघाडीसाठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी साथ न देता भाजपाला पोषक अशी भूमिका घेतल्याचा आरोप करून, अल्पसंख्याक समाजाचे मतविभाजन टाळण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला.
>संघ, मोदी विरोध; परिवर्तनाची लढाई
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारात राष्टÑीय स्वयंसेवक संघ व मोदी यांच्या धोरणांच्या विरोधात प्रामुख्याने भर दिला. काँग्रेसच्या बोटचेपी भूमिकेलाही टीकेचे लक्ष्य केले. संविधानाचे राज्य यावे, वंचितांना सत्तेत वाटा मिळावा, याकरिता सामाजिक बदलासाठी परिवर्तनाची लढाई लढत असल्याची साद त्यांनी मतदारांना घातली .
>हेही उमेदवार रिंगणात
अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिगणात आहेत भाजपा, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रमुख लढत होत असून, बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडियाचे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून गजानन हरणे, मुरलीधर पवार, अरुण ठाकरे, प्रवीण कौरपुरीया, सचिन शर्मा हेदेखील रिंगणात आहेत.

Web Title: Akolatan set new record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.