Next

राष्ट्रवादी नेते दिलीप सोपल यांनी मनगटावरील घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:53 PM2019-08-28T16:53:20+5:302019-08-28T16:55:55+5:30

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बार्शी येथील आमदार दिलीप सोपल यांनी आज मुंबईतील मातोश्री बंगल्यावर येऊन शिवसेनेत प्रवेश केला. ...

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बार्शी येथील आमदार दिलीप सोपल यांनी आज मुंबईतील मातोश्री बंगल्यावर येऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केलं. यावेळी मंत्री तानाजी सावंत हेदेखील उपस्थित होते.