Join us

तृतीयपंथी कलाकाराची छोट्या पडद्यावर एन्ट्री, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:30 IST

मराठी मालिकेत तृतीयपंथी कलाकार काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात तर हे विषय थोडया कल्पकरीतीने लोकांसमोर सोनी मराठीवरील ह.म.बने. तु.म.बने ही मालिकेत सादर केली जाते. लवकरच या मालिकेत एक खास आणि कमालीचा विषय मांडण्यात येणार असून या मालिकेच्या माध्यमातून  खरा तृतीयपंथी कलाकार आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे . 

आजवर आपण अनेक चित्रपटात आणि वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीना पाहत आलो आहोत तर आजवर कुठल्या ही मालिकेत किंवा चित्रपटात खऱ्या तृतीयपंथीय माणसाने काम केलं नसून लवकरचं आपल्याला एक खरा खुरा तृतीयपंथी या मालिकेत काम करताना दिसणार आहे. 

या मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? या नव्या कलाकारांला येत्या  २० नोव्हेंबर रोजी ह.म.बने.तु. म.बने पाहायला विसरू नका.

टॅग्स :सोनी मराठीट्रान्सजेंडर