Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीस खेळ चाले: संपत्तीच्या हव्यासापोटी होणार सरिताचा मृत्यू; मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:15 IST

Ratris Khel Chale 3: नाईकांच्या वाड्यात राहायला आल्यापासून केवळ संपत्तीचा विचार करणाऱ्या सरिताच मृत्यूदेखील याच संपत्तीच्या हव्यासापोटी होणार आहे.

 छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. या मालिकेच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता त्याचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या तिसऱ्या भागात मालिकेतील मूळकथा उलगडली जात आहे. यामध्येच आता अण्णा नाईकांच्या सूनेचा म्हणजेच सरिताचा मृत्यू होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. नाईकांच्या वाड्यात राहायला आल्यापासून केवळ संपत्तीचा विचार करणाऱ्या सरिताच मृत्यूदेखील याच संपत्तीच्या हव्यासापोटी होणार आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर 'रात्रीस खेळ चाले ३'चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सरिताला सोन्याचं घबाड लागणार आहे. डोळ्यासमोर सोनं पाहून भारावून गेलेल्या सरिताचा मृत्यू याच संपत्तीमुळे होणार आहे. विशेष म्हणजे अण्णा आणि शेवंता सरिताला पैशांचं आमिष दाखवून तिचा प्राण घेणार आहेत.

दरम्यान, शेअर करण्यात आलेल्या प्रोमोला  घबाडाचा भास म्हणजे मृत्यूचा फास असं कॅप्शन देण्यात आलं आहे. परंतु, आता सरिताचा होणारा हा मृत्यू खरा आहे की केवळ तिला स्वप्न पडलंय हे येत्या रविवारी रंगणाऱ्या महाभागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३टेलिव्हिजनटिव्ही कलाकार