Join us  

छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 7:15 AM

३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत.

ठळक मुद्दे‘छत्रीवाली’मध्ये मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. आता प्रतीक्षा आहे ती मधुराच्या आईच्या होकाराची.

लवकरच 2018 हे वर्षं पूर्ण होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस काय काय करायचे याचे बेत सध्या आखले जात आहेत. अनेक जणांनी तर नववर्षाचे रिझोल्युशन देखील काय असणार हे देखील ठरवले आहे. तसेच वाहिन्यांवर देखील नववर्षांचे कार्यक्रम काय असणार याची घोषणा देखील झाली आहे. हे वर्षं संपायच्या आधी स्टार प्रवाह वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी खास गोष्ट करणार आहे.

३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत.

‘छोटी मालकीण’ मालिकेत रेवतीचा अपघात झाल्यामुळे श्रीधर पुरता खचलाय. अशातच रेवतीचा स्मृतीभंश झाल्यामुळे श्रीधरसोबत आपलं लग्न झालंय ही गोष्टच ती विसरलीय. या गोष्टीचा श्रीधरला प्रचंड मानसिक धक्का बसलाय. रेवतीचं मन श्रीधर कसं जिंकणार? याची रंजक कहाणी ३० डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

‘छत्रीवाली’मध्ये मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. आता प्रतीक्षा आहे ती मधुराच्या आईच्या होकाराची. मधुराच्या आईला म्हणजेच होणाऱ्या सासुबाईंना विक्रम त्याच्या आणि मधुराच्या नात्यासाठी कसे तयार करणार? हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘ललित २०५’मध्ये राजाध्यक्ष कुटुंबावर संकटांची मालिका अखंड सुरूच आहे. राजाध्यक्ष कुटुंबावरचं संकट दूर करण्यासाठी भैरवी पुढाकार घेत असली तरी आता ती खूप मोठ्या पेचात अडकलीय. ऋषभने ठेवलेल्या एका जाचक अटीमुळे भैरवीला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. राजाध्यक्ष कुटुंबावरचं संकट दूर करण्यासाठी भैरवी टोकाचं पाऊल उचलणार का? याचं कोडं या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये उलगडणार आहे.

३० डिसेंबरला सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे हे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. स्टार प्रवाहचा हा रविवार रोमॅण्टिक सण्डे असणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाहललित 205