Join us

जिमला न जाताही कमी करू शकता वाढलेलं वजन, फक्त रोज करा 'ही' सोपी कामं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:30 IST

Belly fat burning tips : काही लोकांकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना जिमला जाण्याचा इंटरेस्ट नसतो. अशात या लोकांसाठी वजन कमी करणं तर अधिक जास्त आव्हानात्मक ठरतं.

Belly fat burning tips : एकदा जर वजन वाढलं तर कमी करणं किती अवघड काम असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळावा लागतो. तेव्हा कुठे शरीरात वाढलेली चरबी कमी होते. पण काही लोकांकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना जिमला जाण्याचा इंटरेस्ट नसतो. अशात या लोकांसाठी वजन कमी करणं तर अधिक जास्त आव्हानात्मक ठरतं. अशा लोकांसाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं हे लोक जिमला न जाताही वजन कमी करू शकतात.

कशी कमी कराल चरबी?

- जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमचा सकाळचा नाश्ता अजिबात टाळू नका. दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्यानं करा. कमी कॅलरी असलेले पदार्थ नाश्त्यात खाऊ शकता. फायबर असलेला नाश्ता केला तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे ओव्हलईटिंग टाळता येते.

- जास्त शुगर असलेल्या पदार्थांमुळं वजन वेगानं वाढू लागतं. तुम्ही तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड टाळले पाहिजे. कारण यात जास्त कॅलरी असतात. त्याशिवाय दिवसभर कमीत कमी ८ ते ९ ग्लास पाणी प्यावं. वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट राहणं फार गरजेचं आहे. यानं तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन वेगानं कमी होतं.

- झोप कमी घेतल्यानंही वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही दररोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्यावी. तेच, तुम्ही ऑफिसमध्ये किंवा बिल्डींग लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा. ही एक बेस्ट एक्सरसाईज आहे. ज्यामुळे पूर्ण शरीर टोन होतं.

- त्याशिवाय काहीही खाताना शांतपणे खा. जे खाल ते हळूहळू चावून खा, यामुळे मेंदुला हे समजण्यासाठी वेळ मिळतो की, पोट भरलं आहे. अशानं तुमचं ओव्हरईटिंग टाळलं जातं आणि वजन कंट्रोल राहतं.

- योगा स्ट्रेचिंगनंही तुम्ही वजन कमी करू शकता. योगामुळे शरीराचा लवचिकपणा वाढतो आणि सोबतच तणावही दूर होतो. रोज काही मिनिटं योगा केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच रोज १५ ते २० मिनिटं पायी चालले तरी फायदा मिळेल.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स