Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > World Potato Day 2025 : वजन कमी करण्यासाठी बटाटे खाणं सोडलं? एक्स्पर्ट सांगतात, बटाट्यानं ‘असं’ होईल वजन कमी...

World Potato Day 2025 : वजन कमी करण्यासाठी बटाटे खाणं सोडलं? एक्स्पर्ट सांगतात, बटाट्यानं ‘असं’ होईल वजन कमी...

World Potato Day 2025 : Best Ways To Cook Potato For Managing Weight : The right way to cook potatoes to make them easily digestible & weight loss friendly : वेटलॉस करताना बटाटा खाणे सोडून देणे कितपत योग्य की अयोग्य, पाहा तज्ज्ञ नेमकं काय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 19:25 IST2025-05-30T19:08:40+5:302025-05-30T19:25:03+5:30

World Potato Day 2025 : Best Ways To Cook Potato For Managing Weight : The right way to cook potatoes to make them easily digestible & weight loss friendly : वेटलॉस करताना बटाटा खाणे सोडून देणे कितपत योग्य की अयोग्य, पाहा तज्ज्ञ नेमकं काय सांगतात...

World Potato Day 2025 Best Ways To Cook Potato For Managing Weight The right way to cook potatoes to make them easily digestible & weight loss friendly | World Potato Day 2025 : वजन कमी करण्यासाठी बटाटे खाणं सोडलं? एक्स्पर्ट सांगतात, बटाट्यानं ‘असं’ होईल वजन कमी...

World Potato Day 2025 : वजन कमी करण्यासाठी बटाटे खाणं सोडलं? एक्स्पर्ट सांगतात, बटाट्यानं ‘असं’ होईल वजन कमी...

सध्या वाढत्या वजनाने आपल्यापैकी अनेकजण हैराण आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. वजन कमी करायचं असेल तर सर्वात आधी डाएट आणि एक्सरसाइज या दोन गोष्टींवर अधिक जास्त भर दिला जातो. यातही, काहीजण डाएट करताना अमुक - पदार्थ नको, तमुक एखादा पदार्थ खाल्ल्याने (World Potato Day 2025) वजन वाढते असा समज (Best Ways To Cook Potato For Managing Weight) करुन काही पदार्थ खाणे कायमचेच सोडून देतात. जेव्हा आपल्या मनात वेटलॉस करायचा विचार येतो तेव्हा, सर्वातआधी बटाटा खायचा बंद करण्याचा विचार आपल्या डोक्यात येतो(The right way to cook potatoes to make them easily digestible & weight loss friendly).

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने, बटाटा खाल्ल्याने आपले वजन वाढतेच असा अनेकांचा समज आहे. यासाठीच, जर वजन कमी करायचे असेल तर अनेकजण सगळ्यांत आधी बटाटा खाणेच सोडून देतात. परंतु खरंच बटाटा न खाल्ल्याने वजन कमी होते का ? किंवा वजन कमी करण्यासाठी बटाटा खाणेच कायमचे सोडून देणे योग्य की अयोग्य? आज World Potato Day असल्याने सेलिब्रिटी नॅचरोपॅथी एक्सपर्ट जतिन चौधरी, यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीनुसार, वजन कमी करताना बटाटा खाणे सोडून देणे कितपत योग्य की अयोग्य याबद्दल अधिक माहिती घेऊयात. 

वजन कमी करण्यासाठी बटाटा खाणेच सोडून देताय... 

डॉ. जतिन चौधरी यांच्या मतानुसार, बटाटे हे केवळ कार्बोहायड्रेट्सचे स्रोत नाहीत तर त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक देखील असतात जे वजन कमी करण्यासाठी तसेच वजन संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. फक्त वजन कमी करताना बटाटा खाण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण याचे काही नियम पाळल्यास वजन कमी करताना देखील आपण बटाटा खाऊ शकता. 

बटाटे नेहमी सालीसहित खावेत... 

वजन कमी करताना जर तुम्ही बटाटा खाणार असाल तर बटाटा नेहमी सालीसहितच खाण्याला प्राधान्य द्या. भाज्या शिजवत असाल तर बटाटे सालीसहितच शिजवा, यामुळे बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाण टिकून राहते आणि यामुळे आतड्यांचे कार्य सुरळीतपणे चालण्यास मदत होते. याशिवाय, बटाटे उकळून किंवा भाजून देखील आपण खाऊ शकतो. याशिवाय, तुमच्या रोजच्या कॅलरीजचे प्रमाण लक्षात घेऊनच मग बटाटे खा.

सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...

प्रथिनयुक्त पदार्थांसोबतच बटाटे खा... 

वेटलॉस करताना जर बटाटे खायचेच असतील तर ते प्रथिनयुक्त पदार्थांसोबतच खावेत. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य आणि पालक यांसारख्या भाज्यांसोबतच बटाटे खावेत. बटाट्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन 'सी' आणि व्हिटॅमिन 'बी' देखील असते, ज्यामुळे आपले पोट कायमच भरलेले राहते, त्यामुळे आपल्याला वारंवार खूप भूक लागत नाही आणि वजन नियंत्रण राहायला मदत होते.

बटाटे दह्यासोबत खा...

जर बटाटे खाऊनही वजन वाढवायचे नसेल तर ते दह्यासोबत खा. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि बटाट्यातील कार्बोहायड्रेट्स बटाटा  लवकर पचवण्यास मदत करतात. याशिवाय, दह्यामध्ये प्रथिने आणि गुड फॅट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात आणि वारंवार भूक लागण्यापासून रोखतात. 

वेटलॉससाठी मध आणि दालचिनी करतात जादू, वजन होईल झरझर कमी - करुन पाहा हा खास उपाय...

बटाटे भाजून खा... 

बटाटे खाऊन वजन वाढवायचे नसेल तर बटाटे शक्यतो भाजूनच खावेत. १०० ग्रॅम भाजलेल्या बटाट्यांमध्ये ९० इतक्या कॅलरीज असतात. बटाटे  कमी वापर करा, कमी तेलाच्या वापरामुळे ते हलके होतात. भाजल्यामुळे बटाट्यांमधील पोषक तत्वे देखील टिकून राहतात, विशेषतः जेव्हा ते साल न काढताच शिजवले जातात.

बटाटे उकडवून खा... 

जर तुम्हाला वजन वाढवायचे नसेल, तर बटाटे तळण्याऐवजी उकडवून किंवा ग्रील करून खा. उकडलेल्या बटाट्यात कमी कॅलरीज असतात. सूप, सॅलड किंवा हिरव्या भाज्यांसोबत शिजवून ते भाजी म्हणून देखील खाऊ शकता. 

रात्रीच्या जेवणात बटाटा खाणे टाळा... 

रात्री बटाटे खाल्ल्याने शरीरात कार्बोहायड्रेट्स साठून राहू शकतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. यामुळे रात्रीच्यावेळी बटाटे खाणे शक्यतो टाळाच. आपण दिवसा बटाटे खाऊ शकतो,  जेणेकरून शरीर त्याचे उर्जेमध्ये रूपांतर करू शकेल.

Web Title: World Potato Day 2025 Best Ways To Cook Potato For Managing Weight The right way to cook potatoes to make them easily digestible & weight loss friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.