Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय, रोज सकाळी प्या १ खास कॉफी-दिवसभर वाटेल फ्रेश

गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय, रोज सकाळी प्या १ खास कॉफी-दिवसभर वाटेल फ्रेश

Weight Loss : डॉ. अपराजिता लांबा यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये केवळ एक बदल करून प्रेग्नेन्सीनंतर १५ किलो वजन कमी केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:37 IST2026-02-24T09:40:30+5:302026-02-24T15:37:39+5:30

Weight Loss : डॉ. अपराजिता लांबा यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये केवळ एक बदल करून प्रेग्नेन्सीनंतर १५ किलो वजन कमी केलं.

Women loses 15 kg post pregnancy through drinking black coffee | गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय, रोज सकाळी प्या १ खास कॉफी-दिवसभर वाटेल फ्रेश

गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय, रोज सकाळी प्या १ खास कॉफी-दिवसभर वाटेल फ्रेश

Weight Loss : प्रेग्नेन्सीआधी आणि नंतर वाढलेलं वजन महिलांसाठी नेहमीच डोकेदुखीचं असतं. खासकरून सिजेरिअन झालं असेल तर वजन कमी करणं तर अधिक अवघड होऊन बसतं. हार्मोन्समध्ये बदल, कमी झोप, शरीराची रिकव्हरी आणि आई झाल्याच्या जबाबदार पार पाडताना महिलांना पुन्हा शेपमध्ये येणं फारच आव्हानात्मक असतं. पण जर योग्यपणे ठरवून काही गोष्टी केल्या तर वजन लवकर कमी होण्यास मदत मिळू शकते. डॉ. अपराजिता लांबा यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये केवळ एक बदल करून प्रेग्नेन्सीनंतर १५ किलो वजन कमी केलं. डॉ. लांबा सांगतात की, एका सोप्या ड्रिंकने त्यांनी डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यास खूप मदत मिळाली. 

कोणतं ड्रिंक?

डॉ. अपराजिता लांबा यांनी वजन कमी करण्यासाठी सकाळी चहाऐवजी ब्लॅक कॉफी घेणं सुरू केलं. हा त्यांच्यासाठी फारच मोठा बदल ठरला. डॉक्टर सांगतात की, हे केवळ एक ड्रिंक नाही तर रिचुअल आहे. दूध आणि साखरेच्या चहाच्या तुलनेत ब्लॅक कॉफीत कॅलरी नसतात. रोज किमान १ किंवा २ कप कॉफीने कॅलरी हळूहळू कमी होऊ शकतात. 

ब्लॅक कॉफी कशी मदत करते? 

मेटाबॉलिज्म सपोर्ट 

२०१९ मध्ये जर्नल Critical Reviews in Food Science and Nutrition मध्ये प्रकाशित मेटा-अॅनालिसिसमध्ये आढळून आलं की, जास्त कॉफी घेतल्याने शरीराचं वजन, बीएमआय आणि बॉडी फॅटमध्ये कमतरता दिसून आली. म्हणजे कॅफीनने एकट्याने फायदा होतो असं नाही तर सोबतच हेल्दी लाइफस्टाईलही यात महत्वाची भूमिका निभावते.

त्वचेसाठी फायदेशीर 

ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिडसारखे पॉलीफेनॉल्स असतात, जे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेबस कमी करण्यास मदत करू शकतात. याने कोलेजन ब्रेकडाउन स्लो होऊ शकतं म्हणजे त्वचेची लवचिकता अधिक सुधारते. 

हृदयाचं आरोग्य 

बऱ्याच मोठ्या स्टडीजमधून समोर आलं आहे की, कमी प्रमाणात म्हणजे दिवसातून १ ते ३ कप कॉफी प्यायल्याने कार्डिओव्हस्कुलर आजाराचा धोका कमी होतं. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.


काय काळजी घ्याल? 

जर आपण ब्रेस्टफीडिंग करत असाल तर रोज १ ते २ कपांपेक्षा जास्त कॉफी घेऊ नका. अधिक कॅफीनमुळे बाळाची चिडचिड वाढू शकते किंवा झोपेची समस्या होऊ शकते. उपाशीपोटी स्ट्राँग कॉफी घेऊ नका. याने अॅसिडिटी वाढले, तसेच हाय बीपी, एंझायटी, झोप कमी होत असेल तर कॅफीन कमी प्रमाणातच घ्यावं. 

फक्त कॉफीने वजन कमी होईल का? 

याचं उत्तर नाही असं आहे. ब्लॅक कॉफी सपोर्टिंग टूल होऊ शकते, पण फरक लाइफस्टाईलमध्ये बदल करून येऊ शकतो. संतुलित प्रोटीनयुक्त आहार घ्या. भरपूर पाणी प्या. रोज ६ ते ७ तासांची झोप घ्या. काही वेळ वॉक करा. हलका व्यायाम करा.

Web Title : प्रेग्‍नेंसी के बाद वजन घटाना: ब्‍लैक कॉफी से 15 किलो वजन कम हुआ।

Web Summary : डॉ. अपराजिता लांबा ने प्रेग्‍नेंसी के बाद ब्‍लैक कॉफी पीना शुरू किया और 15 किलो वजन कम किया। यह मेटाबॉलिज्‍म को बढ़ाती है और इसमें फायदेमंद एंटीऑक्‍सीडेंट होते हैं। यह हेल्‍दी लाइफस्‍टाइल, संतुलित डाइट और नियमित एक्‍सरसाइज के साथ प्रभावी है।

Web Title : Post-pregnancy weight loss: Black coffee was the key to losing 15kg.

Web Summary : Dr. Aparajita Lamba lost 15kg post-pregnancy by switching to black coffee. It boosts metabolism and contains beneficial antioxidants. While helpful, it's most effective with a healthy lifestyle, balanced diet, hydration, adequate sleep, and regular exercise.