Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस...

ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस...

why losing weight too fast is bad rujuta diwekar weight loss tips : eat homemade food to lose weight tips Rujuta Diwekar : home cooked meals for weight loss Rujuta Diwekar : how to lose weight with homemade food Rujuta Diwekar : कोणतेही डाएट फॉलो न करता घरचे साधे जेवण जेवून वेटलॉस करण्याच्या खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 17:42 IST2025-09-15T17:23:29+5:302025-09-15T17:42:33+5:30

why losing weight too fast is bad rujuta diwekar weight loss tips : eat homemade food to lose weight tips Rujuta Diwekar : home cooked meals for weight loss Rujuta Diwekar : how to lose weight with homemade food Rujuta Diwekar : कोणतेही डाएट फॉलो न करता घरचे साधे जेवण जेवून वेटलॉस करण्याच्या खास टिप्स...

why losing weight too fast is bad rujuta diwekar weight loss tips eat homemade food to lose weight tips Rujuta Diwekar how to lose weight with homemade food Rujuta Diwekar | ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस...

ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस...

दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन कमी करण्यासाठी आपण सगळेचजण खूप प्रयत्न करतो. वाढलेलं वजन आणि पुढे आलेली पोटाची ढेरी पाहून अनेकदा आपल्याला प्रचंड टेंन्शन येत. वाढलेलं वजन फारसे कष्ट न घेता झटपट कमी करण्यासाठी काहीवेळा आपण नको ते उपाय करतो. वेटलॉस करण्यासाठी नको ते उपाय केल्याने वजन कमी होण्याऐवजी (why losing weight too fast is bad rujuta diwekar weight loss tips) वाढते तसेच आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरते. अनेकदा आपण वजन घटवण्यासाठी खूप घाई करतो, ज्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर (eat homemade food to lose weight tips Rujuta Diwekar) सांगतात की, वेटलॉस करण्यासाठी योग्य (home cooked meals for weight loss Rujuta Diwekar) पद्धतीचा वापर केल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. कोणत्याही महागड्या आणि स्पेशल डाएटऐवजी, घरी तयार केलेले साधे जेवण खाऊनही आपण वेटलॉस सहज करु शकतो(how to lose weight with homemade food Rujuta Diwekar).

आपल्यापैकी बरेचजण वेटलॉस करण्यासाठी एकदम कडक किंवा फॅन्सी डाएट प्लान किंवा सप्लिमेंट्सची मदत घेतात. परंतु सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर सांगतात की, वजन कमी करण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे घाई न करता हळूहळू आणि योग्य पद्धतीने वेटलॉस करणे. कोणत्याही स्पेशल डाएटशिवाय, घरचे साधे, पौष्टिक जेवण खाऊनही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करता येऊ शकते. रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत, कोणतेही डाएट फॉलो न करता घरचे साधे जेवण खाऊन वेटलॉस करण्याच्या खास टिप्स सांगितल्या आहेत त्या पाहूयात. 

घरचे साधे जेवण खाऊन वेटलॉस करण्याच्या खास टिप्स... 

१. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी कोणत्याही प्रकारचे कडक आणि फॅन्सी डाएट फॉलो न करता, फक्त घरचे जेवण जेवून वेटलॉस नेमके कसे करावे याबद्दल काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, घरच्याघरीच तयार केलेले रोजचे अन्नपदार्थ खाऊन देखील सहज वजन कमी करता येते. विशेष करून घरचे जेवण वजन वेगाने कमी करण्यास मदत करू शकते. यासाठीच, वजन कमी करण्यासाठी सर्वातआधी बाहेरचे अन्नपदार्थच खाणे टाळून घरचे जेवण जेवायला सुरुवात केली पाहिजे. ज्यात प्रत्येक प्रकारच्या सिझनल भाज्या, फळे आणि लोकल फूड, स्थानिक त्या - त्या भागात पिकवली जाणारी धान्ये व कडधान्ये यांचा समावेश असावा. याशिवाय, जेवणाच्या वेळा पाळा आणि वेळेवर झोपा. या गोष्टी फॉलो केल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म चांगले राहील. तसेच, पुरेशी झोप घेतल्याने कोर्टिसोलची पातळी वाढणार नाही आणि वजन कमी करण्यास मदत होईल. 

आता शुगर वाढणार नाही, डायबिटीस राहील नियंत्रणात! जेवणाच्या ताटात हव्याच ६ भाज्या - राहाल एनर्जेटिक...  

घरीच तयार केलेलं जेवण जेवून होईल वजन कमी... 

जर तुम्ही घरचे जेवण खाल्ले आणि योग्य पद्धतीने आहार घेण्यासोबत व्यायाम केला, तर पहिल्या ३ महिन्यांतच तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात आल्यासारखे वाटेल आणि आरोग्यही सुधारण्यास मदत होईल. त्यानंतरच्या ३ महिन्यांत तुम्ही अनुभवाल की, तुमचे वजन कमी झाले आहे आणि तुमच्या शरीराच्या आकारातही बदल झाला आहे. अशाप्रकारे, नियमित आणि नियंत्रित पद्धतीने आहार आणि व्यायाम करत राहिल्यास, कोणत्याही विशेष डाएटला फॉलो न करताच तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

तेल की तूप, फोडणीसाठी काय फायदेशीर ? ९९% लोकांना माहीतच नसते रोजची १ चूक - होते आरोग्याचे नुकसान... 

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरत नाही ? टिफिनमध्ये न्या २ पदार्थ - झोप अजिबातच येणार नाही... 

झटपट वजन कमी करणे का आहे धोकादायक ?

रुजुता दिवेकर सांगतात की, कमी वेळात झपाट्याने वजन कमी करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. जर तुम्ही २ ते ४ आठवड्यांमध्ये वेगाने वजन कमी करत असाल, तर याचा अर्थ तुमच्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. लवकर वजन कमी करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळा निर्माण होणे. याव्यतिरिक्त, यामुळे :

१. तुमचे हार्मोन (Hormones) बिघडू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते.

२. तुमच्या चेहऱ्याची चमक नाहीशी होऊ शकते.

३. वेगाने केस गळू शकतात.

४. झोप न येणे.

५. चिडचिडेपणा आणि उदासीनता जाणवू शकते.

Web Title: why losing weight too fast is bad rujuta diwekar weight loss tips eat homemade food to lose weight tips Rujuta Diwekar how to lose weight with homemade food Rujuta Diwekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.