बरेच जण असे आहेत ज्यांना नेहमीच गोड खावंसं वाटतंं. अगदी भरपेट जेवण झालेलं असतं. पण तरीही जेवण झाल्यानंतर काही ना काही तरी गोड लागतंच. खरंतर जेवणानंतर गोड खाल्लं तर वजन वाढण्याचं ते एक मोठं कारण असतं. पण तरीही गोड खाण्याचा प्रचंड मोह होतो आणि तो आवरता येत नाही (Why Someone Feel Sugar Craving After Meal). अशा पद्धतीचं शुगर क्रेव्हिंग का होतं आणि ते टाळण्यासाठी काय करावं, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती पाहुया..(Why do you crave something sweet after meals?)
जेवणानंतर शुगर क्रेव्हिंग का होतं?
जेवणानंतर बऱ्याच जणांना गोड खाण्याची प्रचंड इच्छा का होते, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी amitagadre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
पिझ्झा करण्याची ‘ही’ सोपी झटपट रेसिपी पाहा, मुलांना हवा ना पिझ्झा द्या पोटभर-पौष्टिक आणि चमचमीत
यामध्ये एक्सपर्ट सांगत आहेत की जर तुम्हाला जेवणानंतर शुगर क्रेव्हिंग होत असेल तर तुमच्या आहारात प्रोटीन्सची खूप कमतरता आहे. तुम्ही भलेही अगदी पोटभर जेवत असाल, तुमच्या जेवणात अनेक पौष्टिक गोष्टी असतील.. पण तरीही तुमच्या जेवणात पुरेसं प्रोटीन नसेल तर मात्र तुम्हाला नक्कीच शुगर क्रेव्हिंग होऊ शकतं.
त्यामुळे शुगर क्रेव्हिंग टाळण्यासाठी सुरुवातीला काही दिवस जेवणातले प्रोटीन्स वाढवून पाहा. कडधान्ये, डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आहारात वाढवा. काही दिवस प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही शुगर क्रेव्हिंग कमी होऊ शकते.
श्रावणी सोमवार स्पेशल: उपवासाची इडली करा फक्त १५ मिनिटांत, हलकीफुलकी इंस्टंट इडली
काही जण असेही असतात ज्यांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय मागच्या कित्येक वर्षांपासून असते. त्यामुळे सवयीचा भाग म्हणूनही जेवणानंतर अनेकांना गोड खावंसं वाटतं. एक्सपर्ट असंही सांगतात की जेवणानंतर गोड खावं वाटत असेल तर अवश्य खा. पण थोडी पथ्ये मात्र नक्की पाळा. जेवणानंतर अगदी थोडंसं गोड खा. गोडामधले काही पौष्टिक पदार्थ खा. वजन, शुगर वाढणार नाही.