What causes rapid weight gain in females: लठ्ठपणा आजकाल एक मोठी समस्या झाली आहे. पुरूषांपेक्षा महिला लठ्ठपणानं अधिक पीडित असतात. त्यांचं वजन वाढत जातं पण त्यांना याची कल्पनाही राहत नाही. सामान्यपणे 25 ते 30 वयाच्या महिलांचं वजन वेगानं वाढतं. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. जर तुम्ही सुद्धा वजन वाढल्यामुळं किंवा लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर याची काही कारणं आम्ही सांगणार आहोत. जेेणेकरून तुम्ही वजन कंट्रोल करू शकाल.
काय सांगतात एक्सपर्ट्स?
एक्सपर्ट सांगतात की, महिलांची नेहमीच तक्रार असते की, त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये काहीच बदल केला नाही. त्या आधीसारख्याच आपलं जेवण करत आहेत. पण तरी सुद्धा 25 वयातच त्यांचे थाइस, बायसेप्स किंवा पोटाचा घेर वाढतो. याचं कारण मसल्स लॉस होणं आहे. डॉक्टरांनुसार, जसजसं महिलांचं वय वाढतं त्यांच्या मसल्स लॉस होतात आणि त्या जागी फॅट वाढू लागतं.
कसं कमी कराल फॅट?
शरीरातील फॅट कमी करण्यासाठी महिलांना वेट ट्रेनिंग करावं लागेल. अनेक महिला शरीरातील या भागांवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी झुम्बा आणि कार्डिओ एक्सरसाईज करतात. पण यानं जास्त काळ वजन नियंत्रित राहत नाही. म्हणजे तुम्हाला शरीरातील चरबी कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग करावं लागेल.
एक्सपर्ट, वेट ट्रेनिंगनं केवळ तुम्हाला चरबी कमी करण्यास मदत मिळेल. त्यासोबतच याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, तसेच पीसीओसीची 90 टक्के लक्षणं कमी करण्यासही मदत मिळते.