Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या तांदळाचा भात खाल्ला तर वजन होते कमी? पांढरा की लाल? की अजून कोणता वेगळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:00 IST

Best Rice For Weight Loss: भातामध्ये फायबर आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे भूक लवकर लागते आणि वजन वाढण्याचा धोकाही अधिक असतो.

Best Rice For Weight Loss: आज कालच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्यामुळे वजन वाढणं फारच कॉमन झालं आहे. एकदा जर शरीरात वजन वाढू लागलं ततर ते कमी करणं फारच अवघड होऊन बसतं. इतकंच नाही तर शरीराला वेगवेगळे आजारही शिकार बनवतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कुणी डाएट करतं तर कुणी जिमला जातं. तर काही लोक चक्क भात खाणं सोडतात. भातामध्ये फायबर आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे भूक लवकर लागते आणि वजन वाढण्याचा धोकाही अधिक असतो.

भात खाल्लानं काय होतं?

भात आपल्या रोजच्या महत्वाचा भाग आहे. भात मुख्यपणे कार्बोहायड्रेटपासून बनतो. ज्याने शरीराला एनर्जी मिळते. लहान मुलं, खेळाडू आणि शारीरिक श्रम करणाऱ्यासाठी भात खूप फायदेशीर ठरतो. बरेच लोक भाताला जेवणानंतर आळसाचं कारण मानतात. पण यात नॅचरल कार्बोहायड्रेट असतं जे एनर्जी वाढवतं. त्याशिवाय तांदळामध्ये काही व्हिटामिन्स आणि खनिजही असतात, जे ओराग्यासाठी फायदेशीर असतात.

वजन कमी करण्यासाठी कोणते तांदूळ चांगले असतात?

साधारणपणे लोक पांढरे तांदूळच खातात. जे वजन कमी करण्यास मदत करत नाहीत. वजन जर कमी करायचं असेल तर सगळ्यात चांगले तांदूळ म्हणजे ब्राउन राइस. ब्राउन राइस पांढऱ्या तांदळाचा एक चांगला ऑप्शन आहे. ब्राउन राइसमध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त फायबर आणि पोषक तत्व असतात. फायबर प्रमाण यात जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे सतत काही खाण्याची इच्छा कमी होते. तसेच ब्राउन राइसनं पचन तंत्र देखील सुधारण्यास मदत मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Weight Loss: White, Brown, or Other Rice – Which is Best?

Web Summary : Worried about weight gain? Brown rice is better than white rice for weight loss. It's high in fiber, keeps you full longer, aids digestion, and provides essential nutrients.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स