शरीरातली लोहाची कमतरता दूर करून भरपूर प्रोटीन्स, एनर्जी देणारं स्वस्तातलं मस्त सुपरफूड म्हणजे गूळ आणि फुटाणे.. गूळ फुटाणे हा आपल्याकडचा एक पारंपरिक पदार्थ. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यामुळेच कदाचित श्रावणातल्या शुक्रवारी लक्ष्मीची पुजा करून तिला गूळ - फुटाण्यांचा नैवेद्य दाखविण्याला खूप जास्त महत्त्व आहे. हे दोन पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने त्यातून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच इतर खनिजे मिळतात. रक्त शुद्ध करण्यासाठीही गूळ, फुटाणे उपयुक्त ठरतात. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या लाेकांनाही नियमितपणे गूळ फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो (which is the perfect timing for eating chana and jaggery?). गूळ फुटाणे खाण्याचे असे कित्येक फायदे असले तरी ते खाण्याची याेग्य वेळ आपल्याला माहिती पाहिजे. जेणेकरून त्यातल्या पौष्टिक घटकांचा शरीराला भरपूर लाभ होऊ शकेल.(health benefits of eating chana and jaggery together)
गूळ फुटाणे खाण्याची योग्य वेळ कोणती ?
याविषयी डॉ. प्रमोद तिवारी यांनी दिलेली माहिती एबीपी न्यूजने प्रकाशित केली आहे. त्यानुसार डॉक्टर असं सांगत आहेत की सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये तुम्ही मुठभर फुटाणे आणि गूळ खाणे जास्त योग्य आहे. फुटाणे एकतर भिजवलेले असावेत किंवा मग ते भाजलेले असावे.
रोपांनाही खाऊ घाला थोडीशी साखर! भरपूर फुलं येण्यासोबतच होतील ३ जबरदस्त फायदे
फुटाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते जर सकाळच्या वेळी खाल्ले तर पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत होते. तसेच गूळ देखील पचनक्रियेत मदत करणारा असताे. सकाळच्या वेळी गूळ चणे खाल्ल्याने मिळणारी एनर्जी दिवसभर टिकते आणि थकवा येत नाही. त्यामुळे ते शक्यतो सकाळी खा.
यात आपण थोडा बदलही करू शकतो. सगळा दिवस उत्साहात गेल्यानंतर सायंकाळी ५ च्या नंतर अनेकांना खूप थकवा येतो. कित्येक वर्किंग वुमनसाठी यावेळी येणारा थकवा परवडणारा नसतो.
भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम
कारण ऑफिस संपवून घरी गेल्यानंतर त्यांना घरातली कामं, स्वयंपाक, मुलांचा अभ्यास या गोष्टींकडेही पाहायचे असते. अशावेळी थकवा येऊन उपयोग नसतो. म्हणूनच ज्यांना संध्याकाळी थकवा, आळस जाणवतो त्यांनी त्यावेळी गूळ- फुटाणे खावेत. कारण त्यामुळे तुमचा थकवा, अंगातला आळस निघून जाऊन फ्रेश वाटण्यास मदत हाेईल.