Join us

रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर! तज्ज्ञ सांगतात दूध पिण्याची योग्य पद्धत- होतील ३ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2024 18:19 IST

Benefits Of Having Turmeric Milk At Bed Time: तुम्हाला जर दररोज दूध पिण्याची सवय असेल तर रात्री दूध पिणं आरोग्यााठी अधिक चांगलं असतं, असं तज्ज्ञ सांगत आहेत.(ideal time for having turmeric milk)

ठळक मुद्देजर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर त्या दुधामध्ये थोडी हळद आणि थोडं आलं टाकून ते प्या. यामुळे दुधाची कफ प्रवृत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि त्याचा त्रास होत नाही.

दुधाला पुर्णअन्न म्हटलं जातं. कारण दुधातून आपल्याला पुरेपूर पोषण मिळतं. त्यामुळे दररोज थोडं का असेना पण दूध प्यायलाच पाहिजे, असं बरेच तज्ज्ञ सांगतात. वयानुसार दूध पिण्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. पण जर तुम्ही प्रौढ असाल तर तुमच्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी दूध पिणं अधिक फायदेशीर ठरू शकतं (ideal time for having turmeric milk).  आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणत्या पद्धतीने दूध प्यायलं पाहिजे (benefits of having milk at bed time) आणि त्याचा शरीराला काय लाभ होऊ शकतो, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही खास माहिती...(which is the perfect time for having milk?)

 

दूध पिण्याची योग्य पद्धत

रात्रीच्या वेळी नेमकं कसं दूध प्यावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी drvasantlad या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

यामध्ये ते सांगत आहेत की जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर त्या दुधामध्ये थोडी हळद आणि थोडं आलं टाकून ते प्या. यामुळे दुधाची कफ प्रवृत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि त्याचा त्रास होत नाही.

फेसपॅक-फेसमास्क लावण्याची गरजच नाही, 'हा' उपाय करा- चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक

हळद आणि आलं टाकलेल्या दुधात जर तुम्ही चमचाभर तूप टाकून प्यायलं तर त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही. सकाळी पोट लवकर साफ होतं. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा ज्यांना पोट साफ होण्यासाठी दररोजच खूप जास्त वेळ द्यावा लागतो, त्यांच्यासाठी या पद्धतीने दूध पिणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. 

 

दुधामध्ये हळद, आलं आणि तूप हे तीन पदार्थ टाकून प्यायल्यामुळे शरीरावर आलेला ताण, थकवा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

नेहमीच विकतचं दही खाता? आरोग्यासाठी ते कितपत चांगलं? दही विकत आणताना ३ गोष्टी तपासा

अंग रिलॅक्स होतं आणि त्यामुळे मग शांत झोप लागते. त्यामुळे ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही किंवा झोप लागली तरी शांत झोप होत नाही, अशा लोकांनीही वरील पद्धतीने सांगितलेलं हळदीचं दूध प्यायला पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सदूध