आपल्यापैकी काही जण चहाचे शौकिन असतात तर काही जणांना कॉफी प्रचंड आवडते. काॅफीशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. आता चहा पिणं उत्तम की कॉफी पिणं चांगलं हा वाद आपल्याला घालायचा नाहीये. कारण तो शेवटी प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विषय आहे. पण जर योग्य प्रमाणात योग्य वेळी तुम्ही चहा, कॉफी आणि लिंबू पाणी प्यायलात तर ते तुमच्या तब्येतीसाठीही चांगलं आहे. तज्ज्ञ सांगतात की हे तिन्ही पदार्थ पिण्याची एक खास वेळ आहे आणि ती वेळ नेमकी कोणती ते पाहूया..(which is the correct time to have coffee, tea and limbu pani?)
चहा, कॉफी आणि लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
दिवसभरातून चहा कधी प्यावा, कॉफी कधी घ्यावी आणि लिंबूपाणी कोणत्या वेळी घेणं आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
पोटाचा- कंबरेचा घेर वाढतच चालला? ७ गोष्टी तातडीने करा- सुटलेले बेढब पोट होईल कमी
यामध्ये एक्सपर्ट असं सांगत आहेत की दिवसाच्या सुरुवातीला आपल्या शरीराला काहीतरी उबदार हवं असतं. शिवाय ते पेय असं हवं ज्यामुळे आपली झोप पुर्णपणे जाईल आणि आपल्याला फ्रेश वाटेल. त्यासाठी योग्य पर्याय म्हणजे कॉफी. म्हणूनच दिवसाच्या सुरुवातीला कॉफी प्या. पण ती कॉफी दूध आणि साखर न घालता घेण्याचा प्रयत्न करा.
चहा हे एक असं पेय आहे जे आपल्याला कॉफीप्रमाणे सुपरॲक्टीव करत नाही. ते आपल्याला शांत आणि अलर्ट ठेवतं. त्यामुळे जेव्हा ११ ते १२ यावेळी कामात असताना जर आपल्याला काही पिण्याची इच्छा झाली तर तेव्हा चहा प्या. चहासुद्धा दूध आणि साखर न टाकता घ्या, असं ते सुचवतात.
कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग, डेडस्किन होईल गायब
तज्ज्ञांच्या मते लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ म्हणजे संध्याकाळ. बहुतांश लोक संध्याकाळी चहा, कॉफी पितात. पण ते टाळून लिंबूपाणी प्या. कारण यावेळी आपल्या शरीरातलं सोडियम आणि पाणी दोन्हीही कमी झालेलं असतं. ते दोन्ही लिंबूपाण्यातून मिळतं. संध्याकाळी जर लिंबूपाणी प्यायलं तर त्यामुळे गोड तसेच काहीतरी चटपटीत खाण्याचं क्रेव्हिंगही कमी होतं. म्हणून संध्याकाळचा वेळ लिंबूपाण्यासाठी राखून ठेवा.