नियमित वॉक (Walk) करणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. यामुळे फक्त वजन कमी होत नाही तर अनेक प्रकारचे शारीरिक विकार दूर होण्यासही मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहते, हार्ट डिसिज, डायबिटीस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. पण कोणत्यावेळी वॉक करावं याबाबत बरेच लोक गोंधळलेले असतात.वॉक केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. रात्री जेवल्यानंतर वॉक करणं उत्तम ठरतं की सकाळी वॉक करणं. असा प्रश्न अनेकांना पडतो. वॉक करण्याची योग्य पद्धत,किती वेळ, कोणत्यावेळी चालावं ते समजून घेऊ. बरेचजण रोज वॉक करतात तरी वजन कमी होत नाही अशी तक्रार करतात. (Which Is Right Way To Walk)
सकाळी चालण्याचे फायदे
ताजी हवा आणि शांतता- सकाळच्यावेळी वातावरणात प्रदूषणाचा स्तर खूपच कमी असतो.ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. शांततापूर्ण वातावरणात चालल्यानं शरीर ताजंतवानं राहतं.
वजन कमी होण्यास मदत - सकाळच्यावेळी चालल्यानं मेटाबॉलिझ्म एक्टिव्हेट होतो. ज्यामुळे दिवसभरातील कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया वेगानं होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी शरीर एंडोर्फिन हॉर्मोन रिलिज करते. ज्यामुळे दिवसभर एनर्जेटीक आणि पॉजिटिव्ह वाटतं.
जेवल्यानंतर वॉक करण्याचे फायदे
पचनक्रिया चांगली राहते - जेवल्यानंतर वॉक केल्यानं पचनक्रिया एक्टिव्ह राहते. ज्यामुळे अन्न सहज पचते. गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.
ब्लड शुगर नियंत्रणात राहते- जेवल्यानंतर वॉक केल्यानं ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे अधिक फायदेशीर ठरते.
झोप चांगली येते- रात्री जेवल्यानंतर वॉक केल्यानं झोप चांगली लागते. शरीर आणि मेंदू शांत राहण्यासही मदत होते.
शरीर एक्टिव्ह राहतं- जेवल्यानंतर येणारा आळस कमी होतो. थोडावेळ वॉक केल्यानं हलकं आणि एक्टिव्ह वाटतं.
दोन्ही वेळेस वॉक केल्यानं फायदे होतात. हे पूर्णपणे पर्सनल गोल्स आणि रूटीनवर अवलंबून असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, मेटाबॉलिझ्म वाढवायचा असेल दिवसभर एनर्जेटीक राहायचं असेल तर सकाळचा वॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वॉक करू शकता.