Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > फक्त चालून, डाएट करून कमी होत नाही वजन, अन्न शिजवण्याची योग्य पद्धतही महत्वाची!

फक्त चालून, डाएट करून कमी होत नाही वजन, अन्न शिजवण्याची योग्य पद्धतही महत्वाची!

Cooking Method For Weight Loss : ही खास पद्धत म्हणजे वाफेवर पदार्थ शिजवणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:30 IST2025-03-07T16:28:41+5:302025-03-07T16:30:28+5:30

Cooking Method For Weight Loss : ही खास पद्धत म्हणजे वाफेवर पदार्थ शिजवणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. च

Which cooking method keeps your weight control and make you healthy | फक्त चालून, डाएट करून कमी होत नाही वजन, अन्न शिजवण्याची योग्य पद्धतही महत्वाची!

फक्त चालून, डाएट करून कमी होत नाही वजन, अन्न शिजवण्याची योग्य पद्धतही महत्वाची!

Cooking Method For Weight Loss : फक्त पायी चालले, धावले, एक्सरसाईज केली, जेवण कमी केलं, पौष्टिक आहार घेतला म्हणजेच वजन कमी होतं असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकताय. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. या गोष्टीच्या संतुलनानं वजन लवकर कमी होऊ शकतं. अशात अन्न शिजवण्याची एक खास पद्धतही वजन कमी करण्यास मदत करू शकते. ही खास पद्धत म्हणजे वाफेवर पदार्थ शिजवणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. चला तर जाणून घेऊ वाफेवर शिजवलेले पदार्थ खाऊन वजन कमी करण्यास कसा फायदा होतो.

पारंपारिक पद्धत

आधी महिला वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा वापर करत होत्या. यासाठी त्या एका मोठ्या भांड्यात पाणी उकडत होत्या. या भांड्याच्या तोंडावर त्या एक कापड बांधत होत्या. या कापडावर डाळीचे वडे इत्यादी पदार्थ वाफवून तयार केले जात होते.

वाफवलेल्या पदार्थांचे फायदे?

वाफेवर शिजवलेल्या पदार्थांमधून पौष्टिक तत्व नष्ट होत नाहीत. ज्यामुळे यातील प्रोटीन आणि व्हिटॅमिन सुरक्षित राहतात. तसेच अशाप्रकारे अन्न शिजवल्यानं तेल किंवा तूपाची गरज पडत नाही. ज्यामुळे हे अन्न फॅट फ्री मानले जातात. याच कारणानं वजन कमी करणाऱ्यांसाठी हे पदार्थ फायदेशीर मानले जातात. अशाप्रकारे भाज्या शिजवल्याने त्यांचा रंग आणि चमकही कायम राहते.

वजन कंट्रोल राहतं

वजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण कॅलरी असतात. अशात वाफेवर शिजवलेले पदार्थ हे लो कॅलरी फूड असतात. यात तूप किंवा तेलाची गरज नसते. त्यामुळे या पदार्थांना फॅट फ्री मानलं जातं. अर्थातच याने तुमचं वजन वाढत नाही.

हृदय राहतं निरोगी

वाफेवर शिजवलेले पदार्थ हे केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर हृदय निरोगी ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतात. या पदार्थांमुळं हार्ट अटॅकला कारणीभूत कोलेस्टेरॉल वाढत नाही. त्यामुळे हृदयरोगांचा धोका टळतो.

जास्त पौष्टिक

वाफेवर शिजवलेले पदार्थ हे इतर पद्धतीनं शिजवलेल्या पदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक मानले जातात. यात शिजवलेले पदार्थ ना जळतात ना यात काही नुकसानकारक तत्त्व तयार होत. यात भाज्या आणि धान्यांचे सर्वच पौष्टिक तत्व सुरक्षित राहतात.

आता तुम्ही म्हणाल की,  अन्न शिजवण्यासाठी ही पद्धत वापरली तर भरपूर वेळ वाया जाईल. इतका कुणाकडे वेळ नसतो. तर यावर तुम्ही असा तोडगा काढू शकता की, तुम्ही रोज जरी ही पद्धत वापरली नाही तर किमान आठवड्यातून दोन किंवा तीनदा वापरू शकता. सुट्टीच्या दिवशी असं करू शकता.

Web Title: Which cooking method keeps your weight control and make you healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.