वाढत्या वजनाची चिंता तुम्हालाही भेडसावत असेल तर काकडी खाण्याचा हा एक उपाय करून पाहा. आपल्या स्वयंपाक घरातच असे कित्येक पदार्थ सापडतात जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्या पदार्थांपैकीच एक म्हणजे काकडी. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. अगदी ९५ टक्के पाणी असते. त्याशिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि शरीरावरील सूज कमी करणारे काही कम्पाउंड्स असतात. त्यामुळे काकडी पचन चांगले होण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते (Weight Loss Tips By Eating Cucumber). फक्त वजन कमी करण्यासाठी तुम्ही ती खात असाल तर ती नेमकी कोणत्यावेळी आणि कशा पद्धतीने खायला हवी ते एकदा जाणून घ्या...(when should you eat cucumbers for weight loss?)
वजन कमी करण्यासाठी काकडी नेमकी कोणत्या वेळी खावी?
एक्सपर्ट असं सांगतात की साधारण १ वाटी भरून तुम्ही काकडीच्या फोडी खाल्ल्या तर त्यातून तुम्हाला केवळ १६ कॅलरी मिळतात. काकडीमधून पाणी आणि फायबर दोन्हीही भरपूर प्रमाणात मिळते.
एरवी कधीही न मिळणारे 'हे' दागिने आता बाजारात आले आहेत! पटकन बघा- लगेच घ्या..
त्यामुळे जर तुम्ही दुपारच्या जेवणाच्या आधी काकडी खाल्ली तर आपोआपच तिच्यामध्ये असणाऱ्या फायबर आणि पाण्यामुळे पोट भरलेले वाटते आणि जेवण कमी जाते. त्यामुळे वजन कमी करण्याचं मुख्य ध्येय तुमच्यासमोर असेल तर जेवणाच्या १० मिनिटे आधी काकडी खाणं जास्त फायदेशीर ठरेल.
जेवणानंतर काकडी खाल्ली तर....
जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल, चयापचय क्रिया चांगली नसेल तर जेवणाच्या नंतर काकडी खाणं जास्त चांगलं ठरतं. ज्या लोकांना नेहमीच अपचनाचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी जेवणा झाल्यानंतर काकडी खायला हवी.
प्लेन दूध प्यायला मुलं नको म्हणतात? १ उपाय- विकतच्या पावडरची आठवणही न काढता गटागट संपवतील
तिखट जेवण घेतल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर तो टाळण्यासाठीही जेवण झाल्यानंतर काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कधी कधी हॉटेलमधले तेलकट तुपकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातलं सोडीयम वाढतं आणि खूप पाणी पाणी होतं. ते टाळण्यासाठी काकडी खावी. कारण काकडीमध्ये असणारं पोटॅशियम शरीरातलं सोडीयम संतुलित ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे तुमच्या शरीराची नेमकी गरज ओळखा आणि त्यादृष्टीने काकडी कधी खायची ते ठरवा.