Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटाची ढेरी काही केल्या कमीच होत नाही? टेंशन सोडा, खा ‘हे’ ५ पदार्थ, पोट कमी झालंच समजा...

पोटाची ढेरी काही केल्या कमीच होत नाही? टेंशन सोडा, खा ‘हे’ ५ पदार्थ, पोट कमी झालंच समजा...

What To Eat at Night When You're Trying To Lose Belly Fat : Foods to lose belly fat : 5 Effective food to Lose Belly Fat : What are the best foods to reduce belly fat : डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 15:40 IST2025-02-28T15:24:49+5:302025-02-28T15:40:00+5:30

What To Eat at Night When You're Trying To Lose Belly Fat : Foods to lose belly fat : 5 Effective food to Lose Belly Fat : What are the best foods to reduce belly fat : डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल.

What To Eat at Night When You're Trying To Lose Belly Fat Foods to lose belly fat 5 Effective food to Lose Belly Fat | पोटाची ढेरी काही केल्या कमीच होत नाही? टेंशन सोडा, खा ‘हे’ ५ पदार्थ, पोट कमी झालंच समजा...

पोटाची ढेरी काही केल्या कमीच होत नाही? टेंशन सोडा, खा ‘हे’ ५ पदार्थ, पोट कमी झालंच समजा...

आपल्या आहाराचा थेट संबंध आपले आरोग्य व शरीराशी असतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा आपण दिवसभरात जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. सध्याची (What To Eat at Night When You're Trying To Lose Belly Fat) बदलती लाईफस्टाईल आणि व्यायामाची कमतरता यामुळे (Foods to lose belly fat) दिवसेंदिवस पोटावरची चरबी म्हणजेच बेली फॅट्स वाढण्याची समस्या अनेकांना सतावत आहे. सतत वाढत जाणारे बेली फॅट्स ही बहुतेकजणांची सगळ्यांत मोठी अडचण आहे. बाकी शरीर शेपमध्ये असतं. पण पोटावरची चरबी मात्र दिवसेंदिवस सुटतच जाते(5 Effective food to Lose Belly Fat).

लटकणारं पोट कोणालाच आवडत नाही. प्रत्येकालाच वाटतं की आपलं पोट अगदी स्लिम - ट्रिम असावं, पोटाची हट्टी चरबी काढून टाकण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करुन पाहतोच. असे अनेक उपाय करुन पाहिले तरीही एकदा पोटाची चरबी वाढली की ते कमी करणं मोठं कठीण काम असतं. डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी फिजिकल अ‍ॅक्टिव्हीसोबतच डाएटकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी या ५ पदार्थांना आपल्या रात्रीच्या जेवणाचा भाग बनवल्यास बेली फॅट कमी (What are the best foods to reduce belly fat) होण्यास मदत होईल. डाएटिशियन गीतांजली सिंह यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात कोणते मुख्य ५ पदार्थ खावेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

बेली फॅट कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणांत कोणते ५ पदार्थ खावेत ? 

१. दही :- दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स फार मोठ्या प्रमाणांत असतात. जे पचन सुधारण्यास मदत करतात. पोटावरची हट्टी चरबी कमी करण्यासाठी  रात्रीच्या जेवणात दह्याचा समावेश करणे  हा एक उत्तम पर्याय असू शकतो, कारण दही पचायला हलके असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही दह्यात थोडे मध देखील घालून खाऊ शकता, ज्यामुळे त्याची चवही वाढते. तसेच, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दही खाणे फायदेशीर ठरू शकते.

भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

२. भाज्यांचे सूप :- रात्रीच्या जेवणात पचायला हलके भाज्यांचे सूप घेतल्यास ते वजन कमी करण्यासोबतच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचे सूप पिऊ शकता, ज्यामध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असते. सूप तुम्हाला लवकर पोट भरण्यास मदत करते आणि जास्त खाण्यापासून रोखते, ही सवय पोटावारची चरबी कमी करण्यासाठी मदत करू शकेल. 

३. मूग डाळ :- पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळीचा समावेश करू शकता. मूग डाळ पचनास हलकी आणि पोषक तत्वांनी समृद्ध अशी असते. यामध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे तुम्ही तुमच्या आहारात सूप, खिचडी किंवा डाळीच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता. ही डाळ पचायला हलकी असल्याने आपण रात्रीच्या जेवणात अगदी सहजपणे खाऊ शकता. याचबरोबर, पोटावरची चरबी कमी करण्यास देखील ही मूग डाळ अतिशय फायदेशीर असते.   

४. अक्रोड आणि बदाम :- जर तुम्हाला रात्रीची फारशी भूक नसेल किंवा तुम्हाला अगदी थोडे किंवा हलका आहार घ्यायचा असले तर आपण अक्रोड बदाम खाऊ शकता. अक्रोड आणि बदाममध्ये गुड फॅटस आणि प्रथिने भरपूर मोठ्या प्रमाणांत असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. रात्री अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करत नाही किंवा तुम्हांला वारंवार भूक लागत नाही, यामुळे वजन कमी करण्यासोबतच बेली फॅट्स कमी करण्यासाठी अक्रोड आणि बदाम खाणे फायदेशीर ठरते. 

५. हिरव्या पालेभाज्या :- वजन आणि वाढलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पालक, मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या हिरव्या भाज्यांचा सूप किंवा सॅलड करुन खाऊ शकता. हे पदार्थ तुमचे पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवते जेणेकरून तुम्हांला वारंवार भूक लागत नाही. यामुळे वजन व पोटावरची चरबी जाळण्यास अधिक मदत होते.

डार्क चॉकलेट खाऊन वजन करा झटपट कमी, वेटलॉस करण्याचा गोड उपाय - खा बिंधास्त...

Web Title: What To Eat at Night When You're Trying To Lose Belly Fat Foods to lose belly fat 5 Effective food to Lose Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.