Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रियांका चोप्राचं फिटनेस सिक्रेट आहे 'या' ३ गोष्टी, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये न चुकता खाते.....

प्रियांका चोप्राचं फिटनेस सिक्रेट आहे 'या' ३ गोष्टी, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये न चुकता खाते.....

What Priyanka Chopra Eats In A Day: अभिनेत्री प्रियांका चोप्रा फूडी असूनही एवढी फिट कशी? (Priyanka Chopra's diet plan) असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर दिवसभरातला तिचा आहार कसा असतो ते एकदा पाहा..(What Priyanka Chopra eats in breakfast, lunch and dinner?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 12:36 IST2025-03-12T12:35:32+5:302025-03-12T12:36:28+5:30

What Priyanka Chopra Eats In A Day: अभिनेत्री प्रियांका चोप्रा फूडी असूनही एवढी फिट कशी? (Priyanka Chopra's diet plan) असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर दिवसभरातला तिचा आहार कसा असतो ते एकदा पाहा..(What Priyanka Chopra eats in breakfast, lunch and dinner?)

What Priyanka Chopra eats in a day, Priyanka Chopra's diet plan, What Priyanka Chopra eats in breakfast, lunch and dinner, diet tips and fitness tips by Priyanka Chopra | प्रियांका चोप्राचं फिटनेस सिक्रेट आहे 'या' ३ गोष्टी, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये न चुकता खाते.....

प्रियांका चोप्राचं फिटनेस सिक्रेट आहे 'या' ३ गोष्टी, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये न चुकता खाते.....

Highlightsएकंदरीतच प्रियांका सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत जेवण करते हे तिच्या डाएट प्लॅनवरून दिसून येतं. 

बॉलीवूड स्टार प्रियांका चोप्रा प्रचंड फूडी आहे. तिला वेगवेगळे पदार्थ खाण्याची खूप आवड. पुर्वी मॉडेलिंग करताना किंवा आताही एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला मेंटेन ठेवताना कोणते पदार्थ खायचे आणि कोणते टाळायचे हे ठरवताना एक खवय्या म्हणून तिची प्रचंड कसरत होत असणार.. पण तरीही तिने बरोबर मधला मार्ग शोधून काढला आहे (Priyanka Chopra's diet plan). त्यामुळेच आवडीचे पदार्थ खाण्यासोबतच तब्येतही कशी सांभाळता येईल यासाठी तिच्या आहारात खूप निवडक पदार्थ असतात (What Priyanka Chopra eats in a day?). खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये थोडासा बदल करून तुम्हालाही प्रियांकासारखा मधला मार्ग काढता येऊ शकतो (diet tips and fitness tips by Priyanka Chopra). त्यासाठीच बघा नेमका कसा असतो तिचा दिवसभराचा आहार..(What Priyanka Chopra eats in breakfast, lunch and dinner?)

 

प्रियांका चोप्राचा दिवसभराचा डाएट कसा असतो?

नाश्त्यामध्ये प्रियांकाला अव्हाकॅडो टोस्ट तसेच इतर वेगवेगळे प्रकारचे टोस्ट खायला आवडतात. यासोबतच जेव्हा तिला शाकाहारी नाश्ता घ्यायचा असतो तेव्हा तिला इडली, डोसा, पोहे यासोबतच वेगवेगळे पराठे खायला खूप आवडतात. दही आणि तूप यासोबत पराठे खाणं तिला विशेष आवडतं..

 

दुपारच्या जेवणात प्रियांकाला घरी केलेलं अन्न खायलाच जास्त आवडतं. त्यातही ती ज्वारी, गहू, बाजरी यापेक्षा नाचणीचा पराठा किंवा रोटी खाते. नाचणीमध्ये भरपूर फायबर असतात.

Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश.. 

त्यामुळे पुढे बराच वेळपर्यंत भूक लागत नाही. त्यासोबत मग डाळ, वेगवेगळ्या भाज्या ती खाते. ती म्हणते की तिच्या दुपारच्या जेवणात दही, रायता, सलाड आणि लोणचं हे पदार्थ अगदी आवर्जून असतातच. जेव्हा ती भारताच्या बाहेर असते तेव्हा मात्र मग रोस्टेड भाज्या, फ्रेश सलाड असे पदार्थ खाण्यावर तिचा भर असतो. 

 

हे झालं तिच्या नाश्त्याबद्दल आणि दुपारच्या जेवणाबद्दल.. पण तिच्या रात्रीच्या जेवणाची सुरुवातही मोठी इंटरेस्टिंग असते.

तुम्ही खाताय तो मध गूळ- साखरेचा पाक तर नाही? मधामधली भेसळ ओळखण्यासाठी ४ टिप्स

प्रियांका म्हणते की रात्रीच्या जेवणाची सुरुवात करताना मी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं सूप नक्की घेते. आणि त्यानंतर मग पुन्हा नाचणीची रोटी आणि त्यासोबत भाजी, डाळ असे पदार्थ तिच्या डिनरमध्ये असतात. एकंदरीतच प्रियांका सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत जेवण करते हे तिच्या डाएट प्लॅनवरून दिसून येतं. 


 

Web Title: What Priyanka Chopra eats in a day, Priyanka Chopra's diet plan, What Priyanka Chopra eats in breakfast, lunch and dinner, diet tips and fitness tips by Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.