Join us

बिकिनी बॉडीसाठी कियारा आडवाणीने 'या' पद्धतीने घटवलं वजन, परफेक्ट फिगरचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2025 17:00 IST

Weight Loss Secret Of Kiara Advani: कियारा आडवाणीने ज्या पद्धतीने वजन घटवलं, त्याच पद्धतीने तुम्हीही नक्कीच वेटलॉस करू शकता..(What Kiara Advani Ate For Breakfast, Lunch, Dinner For Her Bikini Scene?)

ठळक मुद्देतिने कोणतंही क्रॅश डाएट केलं नाही. कारण तिला स्ट्राँग आणि एनर्जेटीक राहायचं होतं.

आपल्याला माहिती आहे की कियारा आडवाणी नुकतीच एका गोड मुलीची आई झाली आहे. आई म्हणून तिचा नवा प्रवास सुरू झालेला असला तरी करिअरवरही तिचा तेवढाच फोकस आहे. त्यामुळेच तर तिच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या वॉर २ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या बिझी आहे. या चित्रपटामध्ये कियाराने तिचा पहिला ऑनस्किन बिकिनी सीन दिला आहे. त्यामध्ये तिची फिगर आकर्षक दिसावी, यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आणि योग्य डाएट करून वजन कमी  केलं. यासाठी ती नेमकं काय करत होती, खाण्यापिण्याची नेमकी कोणती पथ्ये पाळत होती, ते पाहा (Weight Loss Secret Of Kiyara Advani).. ती जे काही करत होती, ते सर्वसामान्य महिलांनाही अगदी सहज करता येण्यासारखं आहे.(What Kiara Advani Ate For Breakfast, Lunch, Dinner For Her Bikini Scene)

 

परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी कियारा आडवाणीने वजन कसं कमी केलं?

कियारा आडवाणीने आहारतज्ज्ञ निकोल केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी केलं. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ते सांगतात की कियाराला "in the best shape of her life" मध्ये आणण्यासाठी त्यांनी काही साध्या साध्या गोष्टींवर भर दिला होता.

श्रावणी सोमवार स्पेशल उपवासाचा खमंग कुरकुरीत डोसा, १५ मिनिटांत होणारी इंस्टंट रेसिपी-पचायलाही हलका

तिने कोणतंही क्रॅश डाएट केलं नाही. कारण तिला स्ट्राँग आणि एनर्जेटीक राहायचं होतं. त्यामुळे सगळ्यात आधी तर तिच्या आहारातलं प्रोटीन्सचं प्रमाण वाढविण्यात आलं. कॅलरी कमी करण्यात आल्या आणि कोणताही अन्नघटक पुर्णपणे बंद न करता सगळं काही प्रमाणशीर पद्धतीने तिला देण्यात आलं. रोज एकच प्रकारचा आहार तिने घेतला नाही. तर तिचं वर्कआऊट कसं होत आहे, यानुसार रोजच तिच्या आहारात बदल केले जात होते. 

 

आहारात प्रोटीन्स आणि गुड फॅट्स चांगल्या प्रमाणात असल्यामुळे इन्फ्लामेशन कमी झालं आणि चयापचय क्रिया चांगली झाली. नाश्त्यामध्ये ती ओट्स, अक्रोड, प्रोटीन पावडर यांच्यापासून तयार केलेले पॅनकेक आणि फळं खायची.

१ पैसाही खर्च न करता घरच्याघरी करा आरोग्य तपासणी- ५ मिनिटांत कळेल तुमची तब्येत कशी आहे?

जेवणात बेबी पोटॅटो, अस्पॅर्गस, अव्हाकॅडो, कच्च्या भाज्या खाण्यावर भर होता. जेवणाच्या वेळा तिने कटाक्षाने पाळल्या. नियमितपणे व्यायाम केला, तसेच सातुचे पीठ हा देखील तिच्या रोजच्या आहारातला एक महत्त्वाचा पदार्थ होता. असे काही बदल करून तुम्हीही नक्कीच वेटलॉस करू शकता.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सकियारा अडवाणीफिटनेस टिप्सआरोग्य