Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वॉटर फास्टिंग काय आहे आणि केवळ पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? पाहा नेमकं काय होतं

वॉटर फास्टिंग काय आहे आणि केवळ पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? पाहा नेमकं काय होतं

Water Fasting Benefits: वॉटर फास्टिंगचा अर्थ आहे की, एका ठराविक वेळेसाठी फक्त पाणी पिणं आणि कोणताही आहार न घेणं. हा काळ २४ तासांपासून ते अनेक दिवसांचा असू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:04 IST2026-04-01T10:03:01+5:302026-04-01T10:04:49+5:30

Water Fasting Benefits: वॉटर फास्टिंगचा अर्थ आहे की, एका ठराविक वेळेसाठी फक्त पाणी पिणं आणि कोणताही आहार न घेणं. हा काळ २४ तासांपासून ते अनेक दिवसांचा असू शकतो.

What is water fasting? can you lose weight by drinking only water learn | वॉटर फास्टिंग काय आहे आणि केवळ पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? पाहा नेमकं काय होतं

वॉटर फास्टिंग काय आहे आणि केवळ पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? पाहा नेमकं काय होतं

Water Fasting Benefits: वजन कमी करण्याच्या वेगवेगळ्या उपायांमध्ये वॉटर फास्टिंग हा एक उपाय बरेच लोक फॉलो करतात. बरेच एक्सपर्ट व्हिडिओमध्ये दावा करतात की, केवळ पाणी पिऊन काही दिवसांमध्ये वजन लवकर कमी करता येतं. ऐकायला हे भारी वाटतं. म्हणजे ना डाएट प्लॅन, ना कॅलरी मोजण्याचं काम, ना व्यायामाचं टेंशन. पण मुळात वॉटर फास्टिंग शरीरासाठी एक मोठा बदल असतो. ज्यामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया प्रभावित होतात. कारण यात शरीराला अन्न मिळत नाही आणि अशात शरीराला एनर्जीसाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. काही रिसर्च सांगतात की, याने सेल्सची सफाई होऊ शकते, पण याचे धोकेही कमी नाहीत. त्यामुळे वॉटर फास्टिंग फॉलो करण्याआधी त्याबाबतच्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं ठरतं.

काय असते वॉटर फास्टिंग?

वॉटर फास्टिंगचा अर्थ आहे की, एका ठराविक वेळेसाठी फक्त पाणी पिणं आणि कोणताही आहार न घेणं. हा काळ २४ तासांपासून ते अनेक दिवसांचा असू शकतो. काही लोक याला डिटॉक्स आणि वजन कमी करण्याची पद्धत मानतात. पण याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर वेगळा असतो.

२४ तासात काय होतं?

सुरूवातीला शरीरात आपली स्टोर केलेल्या एनर्जीचा वापर करतं. हा ग्लूकोज स्टोर असतो, जो लिव्हर आणि स्नायूंमध्ये असतो. जसजसा हा एनर्जीचा साठा संपतो, तेव्हा भूक लागते, चिडचिड होते, डोकं दुखतं आणि कमजोरी जाणवू लागते. 

२ ते ३ दिवसांनी काय होतं?

जेव्हा ग्लायकोजन म्हणजे शरीरातील स्टोर एनर्जी संपते, तेव्हा शरीर फॅटला एनर्जीमध्ये बदलू लागतं. याला कीटोसिस म्हणतात. यादरम्यान वजन वेगाने कमी होतं. आपल्याला चक्कर येणे, थकवा आणि तोंडाची दु्र्गंधी अशा समस्या होऊ लागतात. 

३ दिवसांनंतर काय?

जास्त काळ वॉटर फास्टिंग केल्याने शरीर आपली एनर्जी वाचवू लागतं आणि मेटाबॉलिज्म स्लो होतं. सोबतच शरीर प्रोटीनसाठी स्नायूंना तोडण्याचं काम सुरू करतं. यामुळे कमजोरी, लो ब्लड प्रेशर आणि फोकस करण्यास कमतरता जाणवते.

वॉटर फास्टिंगने बॉडी डिटॉक्स होते का?

बरेच लोक असं मानतात की, या फास्टिंगने बॉडी डिटॉक्स होते, पण मुळात आपलं शरीर आधीच लिव्हर आणि किडनीद्वारे स्वत:ला साफ करत राहतं. वॉटर फास्टिंगने ही प्रक्रिया अधिक चांगली होऊ शकते याचा काही ठोस पुरावा नाही. 

वॉटर फास्टिंग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणं घातक ठरू शकतं. कारण याने शरीरात पोषक तत्व कमी होतात, इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, डिहायड्रेशन होतं, चक्कर येतात आणि हार्मोन्समध्येही गडबड होते.

वॉटर फास्टिंगने वजन नक्कीच कमी होतं. पण हे नेहमीसाठी होत नाही. जसेही आपण सामान्य आहार घेणं सुरू कराल तर वजन पुन्हा वाढू लागतं. त्यामुळे हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर बॅलन्स डाएट, नियमित व्यायाम आणि चांगली झोप जास्त प्रभावी ठरते. 

Web Title : वॉटर फास्टिंग: फायदे, नुकसान और वजन घटाने का सरल तरीका

Web Summary : वॉटर फास्टिंग में केवल पानी पीना और भोजन से परहेज करना शामिल है, जिससे वजन कम हो सकता है, लेकिन पोषक तत्वों की कमी और चयापचय धीमा होने जैसे खतरे भी हैं। यह कोशिकाओं को डिटॉक्स कर सकता है, लेकिन इस विधि को आजमाने से पहले डॉक्टर से सलाह लें, क्योंकि संतुलित आहार और व्यायाम दीर्घकालिक स्वास्थ्य के लिए सुरक्षित हैं।

Web Title : Water Fasting: Benefits, Risks, and Weight Loss Explained Simply

Web Summary : Water fasting involves abstaining from food while consuming only water, potentially leading to weight loss but also posing risks like nutrient deficiency and metabolic slowdown. It may detoxify cells, but consult a doctor before trying this method, as balanced diets and exercise are safer for long-term health.