ज्या लोकांना द्राक्ष खायला खूप आवडतं ते गरमीच्या दिवसांत द्राक्ष खाण्याचा आनंद घेऊ शकतात. द्राक्षांमध्ये अशी बरीच पोषक तत्व असतात. द्राक्ष खाल्ल्यानं शरीराला फायदेसुद्धा मिळतात. द्राक्ष फक्त चवीला चांगली नसून यात बरीच पोषक तत्वही असता. द्राक्ष खाण्याचे फायदे समजून घेऊ. द्राक्षांमध्ये व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ए चे प्रमाण भरपूर असते. (What is Best Time to Eat Grapes)
द्राक्ष खाल्ल्यानं इम्यून सिस्टिम चांगली राहते. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही द्राक्षांचे सेवन करू शकता. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा द्राक्ष फायदेशीर ठरतात. हृदयाशी संबंधित समस्या अधिक उद्भवू नयेत यासाठी द्राक्ष खाणं फायदेशीर ठरते म्हणून रोजच्या आहारात द्राक्षांचा समावेश करावा. (Grapes Eating Benefits In Summer)
गॅसेस, पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीसुद्धा द्राक्ष खाल्ली जातात. जर तुम्हाला सांधेदुखीच्या वेदमी कमी करायच्या असतील तर पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा द्राक्षांचे सेवन करू शकता. द्राक्ष हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. चांगले परिणाम मिळण्यासाठी योग्य प्रमाणातच द्राक्ष खा. जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ल्यानं याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो.
एका दिवसाला किती द्राक्ष खावीत?
कोणताही खाद्यपदार्थ खाताना त्याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही हे फळ योग्य प्रमाणात खाता. एका दिवसाला दीड ते २ कप द्राक्ष तुम्ही खाऊ शकता. द्राक्षांचे सेवन जास्त केल्यास तब्येतीचे नुकसानही होऊ शकतं. आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीच्या लोकांनी आंबट फळं खाणं टाळायला हवं. द्राक्ष स्वच्छ धुवून थेट खाऊ शकता. किंवा स्मूदी बनवून पिऊ शकता. पालक, काकडी, केळी पुदिन्यासोबत ब्लेंड करून द्राक्ष खा. याव्यतिरिक्त द्राक्षांवर दही घालूनही तुम्ही खाऊ शकता. द्राक्षांचा ज्यूस पिणंही फायदेशीर ठरतं.
द्राक्ष कोणत्यावेळी खावीत?
द्राक्ष तुम्ही दुपारी किंवा सकाळी मधल्यावेळेत भूक लागल्यास खाऊ शकता. रिकाम्या पोटी द्राक्ष कधीच खाऊ नका. ज्यामुळे गॅस, आंबट ढेकर आणि पचनासंबंधी समस्या उद्भवतात. रात्रीच्यावेळेस द्राक्ष खाणं टाळायला हवं. सकाळी किंवा दुपारी खावीत.
