Weight loss with naturopathy: लठ्ठपणा दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चाचला आहे. लठ्ठपणामुळे अनेक जीवघेण्याचा आजारांचा धोका वाढतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल या कारणांमुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळेच डॉक्टर नेहमीच वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. एक्सरसाईज, डायटिंग, लाइफस्टाईलमध्ये बदल अशा गोष्टी करतात. पण तरीही काही लोकांचं वजन कमी होत नाही. कारण वजन कमी करणं काही इतकं सोपं काम नाही.
वजन कमी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातीच एक प्रभावी मार्ग म्हणजे नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथीमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या वजन कमी करण्यास मदत करतात. सोबतच या गोष्टी करून आरोग्यही चांगलं ठेवण्यास मदत मिळते. अशात हे जाणून घेऊ की, नॅचरोपॅथीमध्ये वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत.
आल्याची चटणी
असे बरेच नॅचरल हर्ब्स आहेत ज्यांच्या मदतीनं वजन कमी केलं जाऊ शकतं. असाच एक प्रभावी उपाय म्हणजे आल्याची चटणी. आल्यामध्ये जिंजरोल आणि डायटरी फायबर असतं. हे तत्व वजन कमी करण्यास मदत करतात. काही रिसर्चनुसार, आल्यामुळं शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉलही कमी करण्यास मदत मिळते. तसेच शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगानं होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
कसा कराल वापर?
रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणावेळी आल्याची एक चमचा चटणी खाऊ शकता. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसू शकतो. त्याशिवाय आल्याचं पाणी किंवा आल्याचा चहा सुद्धा शरीरातील चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरतो.
दालचीनीचं पाणी
दालचिनी हा एक गरम मसाला आहे. ज्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यात अनेक औषधी गुणही असतात. जर सकाळी उपाशीपोटी दालचिनीचं पाणी प्याल तर शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी बर्न करण्यास मदत मिळते. दालचिनी पाणी नियमितपणे प्यायल्यास शरीराचं वजन कमी होतं. तसेच वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल सुद्धा कमी करता येतं. इतकंच नाही तर या पाण्यानं ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल ठेवता येते.
दालचिनीचं पाणी कसं बनवाल?
अर्धा लीटर पाण्यात दालचिनीचे २ ते ३ तुकडे टाका आणि ७ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा. सकाळी यातील एक कप पाणी घ्या आणि ५ मिनिटं उकळू द्या. कोमट झाल्यावर हे पाणी पिऊ शकता.