Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात वजन कमी करायचंय? १ आयडिया, लिहा रोज काय काय खाल्लं-घरबसल्या व्हाल स्लिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:09 IST

Weight Loss Tips : जेव्हा तुम्ही फूड डायरी ठेवता, तेव्हा तुमच्या आहारातील हेल्दी आणि अन्हेल्दी अन्न यांच्यातील गुणोत्तर काय आहे हे तुम्हाला स्वतःला बर्‍याच प्रमाणात समजू लागते.

कामाच्या ठिकाणी लोक दिवसभरात आपण किती काम केलं, काय केलं याचा रेकॉर्ड मेटेंन ठेवतात. यासाठी टू डू लिस्ट सुद्धा तयार केलेली असते. काही लोक आपल्या दिवसभराच्या कामकाजाची डायरी बनवतात. (Why we should maintain food journal) पण फिट आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय खाता पिता याचा सुद्धा रेकॉर्ड ठेवायला हवा. याला फूड जर्नल किंवा फूड डायरी असं म्हणतात. याचे फायदे काय, फूड जर्नल मेटेंन ठेवणं का गरजेचं असतं ते पाहूया. (Weight Loss Tips)

हा एक प्रकारचा डेली लॉग आहे. ज्यात तुम्ही काय खाता पिता, कोणत्यावेळी खाता याचा रेकॉर्ड ठेवता.  जर तुम्ही मसालेदार पदार्थ खाल्ले तर पोटात गॅस किंवा ब्लोटींगचा त्रास होतोय किंवा नाही किंवा दोन जेवणांच्यामध्ये तुम्ही किती अंतर ठेवता, किती वेळानं तुम्हाला पुन्हा भूक लागते हे समजण्यास मदत होते.

फूड जर्नल मेंटेन करण्याचे फायदे

१)  फूड जर्नल मेटेंन केल्यानं तुम्हाला कळतं की कोणते पदार्थ खाल्ल्यानं शरीराल त्रास होतो.

२) दिवसभरात तुम्ही किती कॅलरीज घेता याचा सुद्धा रेकॉर्ड राहतो. 

३) अपचन, गॅस, ब्लोटींग होत असेल तर कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे होते याचा अंदाज येतो.

४)  कोणत्या प्रमाणात कोणत्या पदार्थाचे सेवन करत आहात, तेव्हा वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोणते बदल केले पाहिजेत हे तुम्हाला सहज समजू शकते.

५) विशेषत: मासिक पाळीदरम्यान महिलांनी फूड जर्नल राखले पाहिजे जेणेकरुन मासिक पाळीदरम्यानची क्रेव्हिग्स आणि  योग्यरित्या समजू शकेल आणि कंट्रोल करता येईल.

६) जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधत असाल, तर फूड जर्नल देखील डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यासाठी मदत करू शकते.

७) जेव्हा तुम्ही फूड डायरी ठेवता, तेव्हा तुमच्या आहारातील हेल्दी आणि अन्हेल्दी अन्न यांच्यातील गुणोत्तर काय आहे हे तुम्हाला स्वतःला बर्‍याच प्रमाणात समजू लागते.

८) यामुळे तुम्हाला कॅलरी काऊंट सहज लक्षात येतो आणि वजन वाढ टाळता येते.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स