lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन भराभर कमी करायचंय? घ्या चिया सीड्स, 'असा' करा उपाय-महिनाभरात चरबी घटू लागेल

वजन भराभर कमी करायचंय? घ्या चिया सीड्स, 'असा' करा उपाय-महिनाभरात चरबी घटू लागेल

How To Use Chia Seeds For Weight Loss: अंगावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चिया सीड्स अतिशय उपयुक्त ठरतात... बघा कसा करायचा नेमका उपयोग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2024 03:15 PM2024-05-11T15:15:01+5:302024-05-11T18:10:54+5:30

How To Use Chia Seeds For Weight Loss: अंगावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चिया सीड्स अतिशय उपयुक्त ठरतात... बघा कसा करायचा नेमका उपयोग..

Weight loss tips using chia seeds, how chia seeds helps to lose weight, benefits of chia seeds | वजन भराभर कमी करायचंय? घ्या चिया सीड्स, 'असा' करा उपाय-महिनाभरात चरबी घटू लागेल

वजन भराभर कमी करायचंय? घ्या चिया सीड्स, 'असा' करा उपाय-महिनाभरात चरबी घटू लागेल

Highlightsचिया सीड्स प्रोटीन्स आणि फायबरच्या बाबतीत अतिशय उत्तम असतात. त्यामुळेच त्यांचा योग्य वापर करून आता वजन कसं कमी करायचं ते पाहूया...

वजन कसं कमी करायचं हा अनेकांपुढचा प्रश्न आहे. काही जण त्यासाठी नियमितपणे व्यायाम करतात तर काही जणांचा भर आहारावर असतो. तुमची चयापचय क्रिया आणि पचन क्रिया जर व्यवस्थित असतील, त्यांच्यासाठी पोषक असणारे पदार्थ तुम्ही आहारात घेत असाल तर मग तुमचे वजन नेहमीच कंट्रोलमध्ये राहाते (Weight loss tips using chia seeds). या पदार्थांपैकी एक पदार्थ आहे चिया सीड्स.. चिया सीड्स प्रोटीन्स आणि फायबरच्या बाबतीत अतिशय उत्तम असतात (how chia seeds helps to lose weight). त्यामुळेच त्यांचा योग्य वापर करून आता वजन कसं कमी करायचं ते पाहूया... (benefits of chia seeds)

 

चिया सीड्सचे फायदे

१. चिया सीड्सला प्रोटीन्सचे पॉवरहाऊस म्हणतात. बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असतेच. त्यामुळे त्यांच्यासाठीही चिया सीड्स अतिशय उपयुक्त ठरू शकतात. शरीरात प्रोटीन्स उत्तम प्रमाणात असतील तर आपोआप फूड क्रेव्हिंग किंवा सतत काहीतरी गोड खावंसं वाटण्याचं प्रमाण खूप कमी होतं.

घामामुळे अंगाला घाण वास येतो, परफ्यूम- डिओ लावूनही दुर्गंधी लपेना... ३ सोपे उपाय- राहाल फ्रेश

२. चिया सीड्समध्ये असणारे फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

३. चिया सीड्समध्ये व्हिटॅमिन्स तसेच लोह, मँगनीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, फॉलेट ही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

४. चयापचय क्रिया उत्तम करण्यासाठी चिया सीड्समधले फायबर मदत करतात.

 

वजन कमी करण्यासाठी कसे करावे चिया सीड्सचे सेवन?

१. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे १ टीस्पून चिया सीड्स १ ग्लास पाण्यात कमीतकमी अर्ध्या तासासाठी भिजत घाला. त्यानंतर हे पाणी गाळून पिऊन टाका. तुम्ही रात्रभर पाण्यात चिया सीड्स भिजत टाकून सकाळी ते पाणी प्यायलं तरी चालेल.

ओठांच्या आजुबाजुची त्वचा काळवंडली? तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास, त्याकडे दुर्लक्ष नकोच, कारण.... 

२. असं नुसतं पाणी प्यायला आवडत नसेल तर लिंबू पाणी, कैरीचं पन्हं, कोकम किंवा इतर कोणत्या सरबतामध्ये, मिल्कशेकमध्ये किंवा मग स्मूदी, सलाड यांच्यामध्ये टाकून चिया सीड्स घ्या.

३. बाटलीभर पाण्यात दोन ते तीन टीस्पून चिया सीड्स टाका आणि तेच पाणी तहान लागल्यावर प्या....
यापैकी जी पद्धत सोपी वाटेल ती करा आणि वजनात दिसून येणारा परिणाम बघा.. 

 

Web Title: Weight loss tips using chia seeds, how chia seeds helps to lose weight, benefits of chia seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.