Join us

रात्री झोपण्यापुर्वी प्या 'हा' वेटलॉस टी- १५ दिवसांत पोटावरची चरबी कमी होऊन दिसाल शिडशिडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 14:38 IST

Healthy Method Of Weight Loss By Health Expert: निरोगी पद्धतीने कमीत कमी दिवसांत वजन कमी करायचं असेल तर हा एक सोपा उपाय एकदा करून पाहाच..(weight loss tea that helps to reduce weight and belly fat in few days) 

ठळक मुद्देरोज नियमितपणे हा उपाय केल्यास आरोग्यावर खूप चांगला परिणाम दिसू येईल.

वाढतं वजन कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. पण हे प्रयत्न योग्य पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. कारण वजन कमी करण्याच्या नादात जर तब्येतीकडे दुर्लक्ष झालं तर ते महागात जाऊ शकतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अशी एखादी पद्धत हवी जेणेकरून आपलं वजन ती कमी होईलच पण आरोग्याच्या इतर काही तक्रारीही दूर होतील. अशा एखादा वेटलॉसचा हेल्दी मार्ग तुम्ही शोधत असाल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा (weight loss tea that helps to reduce weight and belly fat in few days). अगदी १५ दिवसांतच तुम्हाला खूप चांगला फरक दिसून येईल असं त्या सांगत आहेत.(healthy method of weight loss by health expert)

 

वजन कमी करण्याचा सोपा उपाय

वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने एक काढा करायचा आणि तो रोज रात्री प्यायचा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी balancenutrition.in या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

प्रत्येक यशस्वी खेळीनंतर विराट कोहलीला आठवते 'ती'- काय आहे 'Man In Love' ची रोमॅण्टीक गोष्ट?

यामध्ये त्या सांगतात की वेटलॉस टी म्हणजेच झटपट वजन कमी करण्यासाठीचा काढा तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा लीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये ओवा आणि बडिशेप यांचं मिश्रण एक चमचा घाला. त्यानंतर त्या पाण्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा धणे घाला. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. 

त्यानंतर गॅस बंद करा आणि १५ मिनिटांसाठी ते पाणी झाकून ठेवा. त्यानंतर थोडं गरम असतानाच हे पाणी झोपण्यापुर्वी पिऊन घ्या. रोज नियमितपणे हा उपाय केल्यास आरोग्यावर खूप चांगला परिणाम दिसू येईल.

 

बडिशेप, ओवा आणि धन्याचा काढा पिण्याचे फायदे

१. पोटावरची चरबी तसेच वजन कमी होण्यास मदत होेईल.

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

२. ॲनिमियाचा त्रास कमी होईल.

३. इस्ट्रोजीन तसेच इतर हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त.

४. शांत झोप येण्यासाठीही हा काढा उपयुक्त ठरतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स