Join us
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करायचंय? मग फॉलो करा डाएटबाबतचा हा नवा फंडा, संशोधनातून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:14 IST

Weight Loss : वजन कमी करण्याबाबत कोणती डाएट महत्वाची ठरते? असा प्रश्न पडला असेल तर नव्या संशोधनातून यावर उत्तर मिळालंय. पाहा काय सांगतं संशोधन...

Weight Loss : वाढलेलं वजन, बाहेर आलेलं पोट हे हल्ली गंभीर विषय झाले आहेत. कारण लठ्ठपणा वाढला तर शरीर वेगवेगळ्या घातक आजारांच्या जाळ्यात अडकतं. हेही सगळ्यांना माहीत असतं. मग मुद्दा येतो तो वजन कमी करण्यासाठीच्या डाएटचा. वजन कमी करायचं म्हटलं तर डाएट काय असावी? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. मात्र, हल्लीच प्रकाशित झालेल्या संशोधनाने या प्रश्नावर तोडगा सुचवला आहे. संशोधनात सांगण्यात आलंय की, वजन कमी करण्यासाठीचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे वेगवेगळी डाएट नाही, तर एकप्रकारचं हेल्दी रूटीन फॉलो करणं हा आहे. जर आपण रोज एकाच पद्धतीचं जेवण केलं आणि कॅलरी बॅलन्स ठेवल्या तर, शरीर वजन कमी करण्यात अधिक चांगलं काम करतं.  

अलिकडेच हेल्थ सायकॉलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालंय. हे संशोधन ओरेगन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलं. ज्यात ११२ ओव्हरवेट लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. सगळ्यांनीच १२ आठवड्यांचा वेट लॉस प्रोग्रॅम फॉलो केला. यादरम्यान संशोधकांनी मोबाइल अॅपद्वारे त्यांचं जेवण ट्रॅक केलं आणि रेग्युलेट वजनही नोट केलं.  

संशोधनातून समोर काय आलं?

संशोधनातून आढळून आलं की, जे लोक एकसारखं जेवण करतात आणि आपल्या कॅलरी मेन्टेन ठेवतात, त्यांचं वजन जास्त कमी झालं. अशा लोकांनी सरासरी ५.९ टक्के वजन घटवलं. तर जे लोक रोज वेगवेगळ्या गोष्टी खात होते, त्यांचं वजन केवळ ४.३ टक्केच कमी झालं. 

संशोधनातून हेही समोर आलं की, जर रोजच्या कॅलरीमध्ये जास्त बदल होत असेल तर वजन कमी होण्याचा वेग कमी होतो. म्हणजे जर कॅलरीमध्ये १०० कॅलरीचा फरक येत असेल तर वजन कमी होण्यास साधारण ०.६ टक्क्यांनी कमतरता येऊ शकते. याचा अर्थ असा होतो की, जर आपल्याला वजन खरंच कमी करायचं असेल तर फार रोज वेगवेगळ्या डाएटपेक्षा एक साधी आणि रेगुलर डाएट फॉलो करणंही कधीही फायदेशीर ठरेल.  

हेल्थ एक्सपर्ट काय म्हणतात? 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आजच्या काळात हेल्दी डाएट फॉलो करणं सोपं काम नाही. सगळीकडे जंक फूड आणि अनहेल्दी फूड मिळतात. अशात लोकांना स्वत:वर कंट्रोल ठेवावा लागतो. त्यामुळे जर आपण जेवणाचं एक नियमित रूटीन तयार केलं तर हेल्दी जेवण करणं सोपं होतं. हळूहळू याची सवयही लागेल.  

जर आपण रोज नवीन गोष्टी खाण्याऐवजी काही हेल्दी पदार्थ फिक्स केले आणि कॅलरीची काळजी घेतली तर हेल्दी सवय लागण्यास मदत मिळेल. पण हेल्थ एक्सपर्ट असंही म्हणतात की, गरजेचं नाही की हा उपाय सगळ्यांवर एकसारखा काम करेल. कारण एका ठराविक डाएटसोबतच आपली लाइफस्टाईलही वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Want to Lose Weight? Follow This Diet Tip, Reveals Research

Web Summary : Consistent, healthy routines, not varied diets, aid weight loss, research suggests. Maintaining a calorie balance with regular meals proves more effective than constantly changing food choices. Sticking to a simple, regular diet is more beneficial for weight loss, experts say.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्ससंशोधन