Weight Loss : सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्नात फिट आणि स्लिम दिसावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. वजन कमी करण्याची चिंता अनेकांना लागलेली असते. अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि वजन कमी होत नसल्यानं स्ट्रेस वाढतो. ज्यामुळे वजन अधिक वाढतं. अशावेळी जास्त टेंशन न घेता डोकं शांत ठेवून योग्य ते उपाय करायला हवेत.
वेट लॉस कोच श्रुति वेकारिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वजन कमी करण्यासंबंधी काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की, या टिप्सच्या मदतीनं तुम्ही ३ महिन्यात २० किलो वजन कमी करू शकता. चला जाणून घेऊ या आहेत या टिप्स.
वजन कमी करण्याच्या १० टिप्स
१) आपलं मोठं लक्ष्य छोट्या-छोट्या आठवड्यांमध्ये विभाजित करा. यानं तुम्हाला लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोटिव्हेशन मिळत राहील. जे वजन कमी करण्याच्या प्रवासात फार गरजेचं असतं.
२) कॅलरी इनटेकवर लक्ष ठेवा आणि कमी कॅलरी असलेला आहार घ्या. असं केल्यास फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होईल.
३) आहारात भरपूर प्रोटीनचा समावेश करा. यामुळे होईल असं की, मसल्स रिपेअर करण्यास मदत मिळेल आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहील. ज्यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा होणार नाही.
४) भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या भाज्या, फळं आणि कडधान्य यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. सोबतच भूकही कंट्रोलमध्ये राहते.
५) दिवसभर भरपूर पाणी प्या आणि वेगवेगळ्या फळांचा ज्यूसही प्या. वजन कमी करत असताना एक्सरसाईज केल्यानं शरीरातील पाणी घामाच्या माध्यमातून बाहेर जातं, ज्यामुळे कमजोरी जाणवू शकते. सोबतच डिहायड्रेशनचाही धोका राहतो.
६) स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, यानं मसल्स वाढवण्यास आणि फॅट वेगानं बर्न करण्यास मदत मिळते. ज्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगानं होते.
७) हाय-इंन्टेसिटी इंटरव्हल ट्रेनिंग कमी-इंन्टेसिटी कार्डिओसोबत मिळून करा. नियमितपणे एक्सरसाईज केल्याचा प्रभाव अधिक दिसून येईल.
८) झोप जर कमी होत असेल तर यामुळे शरीरातील हार्मोन्स प्रभावित होतात आणि भूक वाढते. अशात रोज ७ ते ८ तासांची झोप घेण्यावर भर द्या.
९) मेडिटेशन, योगा यामुळे स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. स्ट्रेसमुळे वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढतं. त्यामुळे स्ट्रेस दूर करण्यासाठी या गोष्टी करा.
१०) शरीर फिट ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा. यामुळे शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.