Join us

उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं वजन कमी होतं का? व्यायाम न करता, कमी न खाताही हे शक्य आहे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:16 IST

Weight Loss : अनेकांना असं वाटत असतं की, उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं वजनही कमी होतं. पण खरंच जास्त घाम येण्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते का?

Weight Loss :उन्हाळ्याला आता सुरूवात झाली आहे. वातावरण बदललं की, आरोग्यासंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या सुरू होतात. अनेकांना असं वाटत असतं की, उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं वजनही कमी होतं. पण खरंच जास्त घाम येण्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते का? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात घाम जास्त येतो. घाम येणं आणि वजन कमी असण्याचा संबंध जोडला जातो. पण खरंच उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं वजन कमी होतं का? हे जाणून घेऊ.

काय सांगतं सायन्स?

आपल्या शरीरात एडिपोज टिशूच्या रुपात फॅट(चरबी) जमा होते. जेव्हाही शरीराची एनर्जी गरज बाहेरुन पूर्ण होत नाही तेव्हा शरीर या जमा झालेल्या फॅटला एनर्जी मध्ये बदलतं आणि आपण फॅट कमी करतो. तुम्ही हिवाळ्यात वर्कआउट करा किंवा उन्हाळ्यात शरीरातून फॅट बर्न होण्याची प्रक्रिया एकसारखीच आहे. 

घामाच्या रुपात फॅट बाहेर येतं?

असं अजिबात होत नाही. शरीराचं तापमन संतुलित करण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान इतकं जास्त असतं की, शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप जास्त घाम येतो. तेच हिवाळ्यात जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीरातील तापमान कमी करण्यासाठी घाम येतो.

उन्हाळ्यात वजन वाढतं का?

वजन वाढणं हे वातावरणावर नाही तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. जेव्हा तुमच्या खाण्यात कॅलरीचं प्रमाण फार जास्त असतं तेव्हा कॅलरी फॅट स्वरुपात शरीरात जमा होतात आणि जाडेपणा वाढतो. जेव्हा शरीरात कॅलरी कमी होतात तेव्हा शरीरातील फॅट एनर्जी होऊन निघून जातं आणि याने वजन कमी होतं. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स