Weight Loss Trick : वजन कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय पायी चालणं मानला जातो. तर काही जिममध्ये तासंतास घाम गाळतात आणि डाएट फॉलो करतात. अनेकांना असं वाटत असतं की, शरीरातील चरबी जाळण्यासाठी शरीराला थकवणं खूप गरजेचं आहे. पण मुळात फॅक्ट वेगळंच आहे. फिटनेस एक्सपर्ट आणि वेट लॉस कोच अंजली सचान यांनी एक असं गणित शेअर केलं, ज्यातून हे स्पष्ट होतं की, कोणतीही मशीन न उचलता, केवळ रस्त्यावर किंवा बागेत फिरूनही आपण १ किलो चरबी जाळू शकता.
१ किलो चरबी आणि कॅलरीचं गणित
अंजली सचान यांच्यानुसार, शरीरातून १ किलो फॅट कमी करण्याचा अर्थ जवळपास ७,७०० कॅलरी बर्न करणं. ही ती चरबी आहे जी शरीरात ऊर्जेच्या रूपात जमा होते. फॅट स्टोर झालेली एनर्जी आहे, त्यामुळे ती जाळण्यास वेळ लागतो. पण एकदा जर ती जळाली तर ती नेहमीसाठी नष्ट होते.
१ हजार पावलांमध्ये किती कॅलरी बर्न होतात
पायी चालत असताना आपलं शरीर मांसपेशींना हलवण्यात, संतुलन ठेवण्यात आणि हार्ट रेट व्यनस्थित ठेवण्यास ऊर्जेचा वापर करतं. कोच सचान सांगतात की, प्रत्येक १ हजार पावलं चालल्यानंतर शरीरातून जवळपास ५० ते ७० कॅलरी बर्न होतात.
१ किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले?
जर आपण हे गणित समजून घेतलं तर १ किलो फॅट जाळण्यासाठी आपल्याला एकूण १.२ लाख ते १.५ लाख पावलं पायी चालण्याची गरज आहे. ऐकायला ही संख्या मोठी वाटते, पण ही रोजच्या छोट्या छोट्या अॅक्टिविटीमध्ये विभागली तर सोपं होईल.
१० ते १२ दिवसात दिसेल फरक
आपण रोज जर १० हजार ते १५ हजार पावलं चाललो तर केवळ १० ते १२ दिवसांच्या आत १.५ लाख पावलं चालण्याचं लक्ष्य पूर्ण करू शकाल. याचा अर्थ असा की, कोणत्याही हेवी वर्कआउट किंवा डाएटशिवाय दोन आठवड्यात १ किलो चरबी कमी करू शकता.
