वजन कमी करायचे म्हणजे आहार संतुलित आणि योग्य असणे फार महत्त्वाचे असते. गोड पदार्थ खाणे टाळणे फार गरजेचे ठरते. त्यासाठी साखर खाणे कमी करावे लागते. (Want to lose weight, but can't control cravings for sweet? try these 4 remedies )मात्र साखर हा रोजच्या आहाराचा भाग असल्याने साखर खाण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. काही सवयी लावून घेतल्याने आणि पर्यायी पदार्थ खाल्याने साखरेचे आहारातील प्रमाण कमी करणे नक्कीच शक्य आहे.
वजन कमी करायचे असेल तर साखरेचे प्रमाण कमी करणे हा मूलभूत बदल आहे. सुरुवातीला अवघड वाटले तरी हळूहळू सवय लागते आणि शरीराला फायदा व्हायला लागला, आपल्याला जाणवायला लागला की इच्छाही कमी होते. साखर कमी केली की वजनावर नियंत्रण मिळते, ऊर्जा वाढते आणि शरीरातील आजारांचे प्रमाण घटते. काही साध्या पण सातत्याने केलेल्या जीवनशैलीतील बदलांमुळे साखरेवर नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि निरोगी, हलके आणि तंदुरुस्त जीवन जगणे सहज शक्य होते. त्यासाठी पाहा काय करु शकता. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.
१. फळांचा आहारात समावेश करणे फारच फायद्याचे ठरेल. फळांमध्ये गोडवा असतो. तसेच साखरही असते. ती नैसर्गिक साखर शरीराला बाधत नाही. त्यामुळे फळे खाल्यावर गोड खाण्याची इच्छा कमी होते. फळे फार पौष्टिकही असतात. वजन कमी करायला मदत होते.
२. आहारात प्रथिनांचा समावेश असेल तर गोड खाण्याची इच्छा कमी होते. मूगडाळ, दही, हरभरे, पनीर, सुकामेवा असे पदार्थ खाल्याने पोट जास्त वेळासाठी भरलेले राहते. पोट भरले की जिभेलाही काही खायची इच्छा होत नाही.
३. दिवसातून पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाणी कमी झाल्यावरही गोड खायची इच्छा होते. कारण साखरेतून ऊर्जा चटकन मिळते. ऊर्जेसोबत मात्र फॅट्स आणि कॅलरीजही मिळतात. ज्या टाळणे गरजेचे असते.
४. पर्यायी पदार्थ वापरा. साखरेऐवजी गूळ खाता येतो. तसेच मधही खाऊ शकता. इतरही काही पर्याय बाजारात उपलब्ध असतात. डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि पर्यायी पदार्थ ठरवा.