Join us

मॉडेलसारखी फिट फिगर हवीय? मेथी दाणे 'या' ३ पद्धतीने खा, वेट लॉसची गॅरण्टी; त्वचाही दिसेल टवटवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2024 15:07 IST

Want a fit figure like a model? Eat fenugreek seeds in 'these' 3 ways, guarantee weight loss; The skin will also get Glow : कशा पद्धतीने मेथी दाणे खाल्ल्याने वजन कमी होते?

हिवाळ्यात (Weight Loss) जास्त भूक लागते असं म्हणतात. थंडीच्या दिवसांमध्ये आपण जास्त प्रमाणात खातो. काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खाण्याची इच्छा होत राहते (Junk Food). अशावेळी आपण मसालेदार पदार्थ खातो. ज्यामुळे पोटाचे विकार वाढतात. यासह वजनही झपाट्याने वाढते. शिवाय थंडीत व्यायाम (Exercise) करण्याचीही इच्छा कमी होते. त्यामुळे आपण व्यायाम करणंही टाळतो (Fitness).

जर दिवाळीतील फराळ आणि मसालेदार पदार्थ खाऊन वजन वाढलं असेल तर, मेथी दाण्यांचा सोपा उपाय करून पाहा. यामुळे सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल. पण वजन कमी करण्यासाठी मेथी दाणे खावे कसे? कशा पद्धतीने मेथी दाणे खाल्ल्यास वेट लॉस होईल?(Want a fit figure like a model? Eat fenugreek seeds in 'these' 3 ways, guarantee weight loss; The skin will also get Glow).

मेथी दाण्याचे आरोग्यदायी फायदे

मेथी दाणे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक ऍसिड, जीवनसत्त्वे अ, ब आणि क यांसारख्या खनिजे आढळतात. ज्यामुळे आरोग्याला फायदेच मिळतात. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल, सोबत केस आणि त्वचेलाही फायदे मिळावे असं वाटत असेल तर, ३ पद्धतीने खा. आरोग्य राहील सुदृढ.

मेथी दाणे खाण्याचे ३ पद्धती जाणून घ्या

पहिली पद्धत

हिवाळ्यात फक्कड चहा हवाय? त्यात घालं '१' पदार्थ; आरोग्य राहील सुदृढ; सर्दी - खोकलाही राहील दूर

वेट लॉससाठी आपण मेथी दाण्याचं हेल्दी ड्रिंक तयार करू शकता. यासाठी रात्री एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात मेथी दाणे घाला. नंतर पाणी झाकून ठेवा. सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या, आणि भिजलेले मेथी दाणे खा.

दुसरी पद्धत

वजन कमी करण्यासाठी आपण मेथी दाण्यांचा चहा तयार करून पिऊ शकता. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे मेथी दाणे घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. नंतर चहाच्या गाळणीने गाळून मेथी दाण्यांचा चहा प्या. आपण हा वेट लॉस चहा सकाळी आणि सायंकाळी पिऊ शकता. साखरेच्या चहाऐवजी मेथी दाण्यांचा चहा वेट लॉससाठी मदत करेल.

गुडघ्यापर्यंत लांब - काळे केस हवेत? खोबरेल तेलात घाला मुठभर 'ही' हिरवी पानं; केस इतके वाढतील की..

मोड आलेले मेथी दाणे

आपण मोड आलेले मेथी दाणे देखील खाऊ शकता. सॅलॅड किंवा भाजीमध्ये मिसळून खाल्ल्याने वेट लॉससाठी मदत होईल. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स