Weight loss tips : लठ्ठपणा वाढला तर शरीराचं स्ट्रक्चर तर बदलतंच, सोबतच शरीर वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात अडकतं. लठ्ठपणामुळे डायबिटीस, थायरॉइड, कोलेस्टेरॉल, हृदयरोगांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन कमी करणं फार गरजेचं असतं. वजन कमी करण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल, डाएटमध्ये बदल आणि एक्सरसाईजची मदत घ्यावी लागते. सोबतच एक असा घरगुती उपाय आहे ज्यानं शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल. यासाठी हा उपाय तुम्हाला १ महिना करावा लागेल.
चरबी कमी करणारं चूर्ण
शरीरात वाढलेली चरबी कमी करणारं हे चूर्ण बनवण्यासाठी १०० ग्रॅम ओवा, १०० ग्रॅम जिरे, १०० ग्रॅम मोठी वेलची, १०० ग्रॅम दालचीनी, १०० ग्रॅम बडीशेप आणि ५० ग्रॅम हळद लागेल.
या सगळ्या गोष्टी मिक्स करून पावडर तयार करा. नंतर एका कढईमध्ये हे मसाले हलके भाजून घ्या. हे पावडर एका काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यात स्टोर करा.
कसा कराल वापर?
सकाळी आणि सायंकाळी १ चमचा पावडर पाण्यात उकडून घ्या. पाणी थोडं थंड झाल्यावर एक एक घोट करून प्यावं. हा उपाय नियमितपणे २ ते ३ महिने केला तर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
चुर्णाचे इतर फायदे
या चुर्णाच्या मदतीनं केवळ लठ्ठपणा कमी होईल असं नाही तर हृदयासंबंधी अनेक आजारांचा धोकाही कमी होईल. त्याशिवाय थायरॉइड आणि डायबिटीससारख्या आजारांपासूनही बचाव होईल. तसेच या पावडरनं केस आणि त्वचेची चमक कायम राहील.
लठ्ठपणा कमी करणारे इतर काही उपाय
- जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर भरपूर पोषण असलेले, कमी कॅलरी असलेले पदार्थ खायला हवे. जसे की, फळं, भाज्या, डाळी आणि सलाद इत्यादी.
- त्याशिवाय डाळी, दही, फळं, भाज्या, कडधान्याचा आहारात समावेश करा. जेणेकरून भूक कमी लागेल. यानं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
- साखर आणि जंक फूड अजिबात खाऊ नका. कारण यांमुळे शरीरात फॅट जमा होतं.
- सोबतच चालणं, धावणं, सायकलिंग, स्वीमिंग यांसारख्या अॅक्टिविटींचा रूटीनमध्ये समावेश करा. यांच्या मदतीनं कॅलरी बर्न करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत मिळेल.