Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्या वजन कमी करणारी कॉफी! 'अशी' कॉफी भारी, कॅलरी कमी होऊन भराभर घटू लागते वजन

प्या वजन कमी करणारी कॉफी! 'अशी' कॉफी भारी, कॅलरी कमी होऊन भराभर घटू लागते वजन

Weight Loss Tips: वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला कॉफी आवडत असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने केलेली कॉफी काही दिवस नियमितपणे पिऊन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 13:52 IST2026-02-16T17:20:56+5:302026-02-17T13:52:04+5:30

Weight Loss Tips: वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला कॉफी आवडत असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने केलेली कॉफी काही दिवस नियमितपणे पिऊन पाहा..

use of black coffee for weight loss, how to use black coffee for weight loss | प्या वजन कमी करणारी कॉफी! 'अशी' कॉफी भारी, कॅलरी कमी होऊन भराभर घटू लागते वजन

प्या वजन कमी करणारी कॉफी! 'अशी' कॉफी भारी, कॅलरी कमी होऊन भराभर घटू लागते वजन

Highlightsयुनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर यांच्या मते ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असतं.

कॉफी हे आता एक लोकप्रिय पेय झालेले आहे. पुर्वी कमी लोक कॉफी प्यायचे. पण आता मात्र चहाचे जेवढे दर्दी आहेत, तेवढीच संख्या कॉफीचे फॅन असणाऱ्या मंडळींची आहे. आता चहा असो किंवा कॉफी असो.. कोणत्याही पेयाचा अतिरेक करणे योग्य नाहीच. पण ते जर मर्यादित स्वरुपात घेतले तर त्याचे निश्चितच वेगवेगळे लाभ शरीराला होऊ शकतात. आता असंच कॉफी पिण्याचे फायदे पाहूया.. काही अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की जर कॉफी एका खास पद्धतीने प्यायली तर ती वेटलॉससाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकते (how to use coffee for weight loss). त्यासाठी ती कशी करायची आणि केव्हा प्यायची ते पाहूया..(use of black coffee for weight loss)

वजन कमी करण्यासाठी कॉफी कशी उपयुक्त ठरते?

 

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर यांच्या मते ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असतं. हे ॲसिड वजन कमी करण्यासाठी मदत करतं. जेवण केल्यानंतर अन्नामधलं ग्लुकोज रक्तात अतिजलद गतीने मिसळू नये आणि ब्लड शुगर वाढू नये यासाठी हे ॲसिड उपयुक्त ठरतं.

ऊन तापू लागताच भूक कमी झाली, करा १० मिनिटांत टोमॅटोची चटणी- चमचमीत चटणी भाजीपेक्षा भारी

याशिवाय या ॲसिडमुळे शरीरात जास्तीचे फॅट तयार होणंही कमी होतं. त्यामुळे शरीरातल्या कॅलरीचं प्रमाणही कमी होतं. फोर्टीस हॉस्पिटलच्या डॉ. सिमरन सैनी यांच्या मते क्लोरोजेनिक ॲसिड हे ॲण्टीऑक्सिडंट्सप्रमाणे काम करतं. 

 

शरीरातलं मीठ वाढलं की शरीराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शरीरावर सूज आल्यासारखी दिसते. शरीर जड झाल्यासारखं वाटतं. हा त्रास कमी करण्यासाठीही ब्लॅक कॉफी उपयुक्त ठरते.

एका रात्रीत त्वचेवर होईल जादू, रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' उपाय; सकाळी आरशात स्वत:कडे पाहातच राहाल

काही तज्ज्ञांच्या मते शरीरातलं जास्तीचं पाणी काढून टाकण्यासाठी ब्लॅक कॉफीची मदत होते. यामुळे आपोआपच शरीरावरची सूज कमी होऊन वेटलॉस होण्यास मदत होते. पण हे फायदे असले तरी ब्लॅक कॉफीचे सेवन मात्र मर्यादितच व्हायला हवे. त्याचा अतिरेक झाल्यास तो तब्येतीसाठी निश्चितच चांगला नाही. 
 

Web Title : वजन कम करने के लिए कॉफी पिएं! जानिए कैसे कॉफी कैलोरी बर्न करती है

Web Summary : ब्लैक कॉफी में क्लोरोजेनिक एसिड होता है, जो ब्लड शुगर को नियंत्रित करके और फैट के निर्माण को कम करके वजन घटाने में मदद करता है। यह एंटीऑक्सीडेंट के रूप में काम करता है, वाटर रिटेंशन को कम करता है और वजन घटाने में सहायक है। स्वास्थ्य लाभ के लिए संयम आवश्यक है।

Web Title : Drink Coffee to Lose Weight! How Coffee Burns Calories Quickly

Web Summary : Black coffee, with chlorogenic acid, aids weight loss by regulating blood sugar and reducing fat formation. It acts as an antioxidant, reduces water retention, and helps in weight loss. Moderation is key for health benefits.