Weight Loss Bacteria : वजन वाढणं आता फारच गंभीर आणि मोठी समस्या बनली आहे. पण वजन कमी करणं आणि कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवणं तसं फारच अवघड काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएट करतात, व्यायाम करतात. पण फायदा मिळतोच असं नाही. कधी कधी तर एकदा कमी झालेलं वजन पुन्हा वाढू लागतं. अशात लोक वैतागून प्रयत्नही सोडून देतात. वजन कमी करण्यासाठी बाजारात काही औषधं सुद्धा आली आहेत. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण आता तर बॅक्टेरियाने देखील वजन कमी करता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील संशोधकांनी एका अशा बॅक्टेरियाचा शोध लावलाय, जो वजन कमी करू शकतो. हा बॅक्टेरिया मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यास मदत करू शकतो. अशात या बॅक्टेरियाच्या मदतीने लोकांना वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन किंवा औषधं घेण्याची गरज पडणार नाही.
'ट्यूरिसीबॅक्टर' ने कमी होईल वजन
यूटा यूनिव्हर्सिटीतील संशोधकांनी उंदरांवर या बॅक्टेरियाचा प्रयोग केला. या प्रयोगात त्यांना आढळून आलं की, खास गट बॅक्टेरिया ट्यूरिसीबॅक्टरने मेटाबॉलिक हेल्थ सुधारते, ज्यामुळे वजन वाढत नाही. संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत, त्या लोकांमध्ये ट्यूरिसीबॅक्टर बॅक्टेरिया कमी असतात. या शोधातून समोर आलं की, मायक्रोब मनुष्यांचं वजन चांगल्या प्रकारे मॅनेज करतात.
गट बॅक्टेरिया वजन करेल कंट्रोल
'सेल्स मेटाबॉलिज्म' जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये संशोधकांनी दावा केला आहे की, गट बॅक्टेरिया व्यवस्थित करून वजन कंट्रोल केलं जाऊ शकतं. ट्यूरिसीबॅक्टर एक रॉडच्या आकाराचा बॅक्टेरिया आहे, जो हाय फॅट डाएट असलेल्या उंदरांमध्ये ब्लड शुगर, रक्तात फॅटची लेव्हल आणि वाढतं वजन कमी करताना आढळून आला. शरीरात वेगवेगळे गट बॅक्टेरिया मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यास मदत करत असतात. असं होऊ शकतं की, जे रिझल्ट प्राण्यावर आढळून आले ते कदाचित मनुष्यांवर लागू पडणार नाही.
मेटाबॉलिक हेल्थ सुधारेल
संशोधकांना आशा आहे की, ट्यूरिसीबॅक्टर अशाप्रकारच्या उपचारासाठी सुरूवातीचा पॉइंट ठरू शकतो. ज्याने मेटाबॉलिज्म हेल्दी होतं आणि वजन वाढणंही कमी होतं. रिसर्चनुसार, ट्यूरिसीबॅक्टर, सेरामाइड्स नावाचे फॅटी मॉलिक्यूल तयार करण्यास मदत करतो, ज्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ सुधारते.
हाय-फॅट डाएटवर सेरामाइडची लेव्हल वाढते आणि सेरामाइडच्या हाय लेव्हलचा अनेक मेटाबॉलिक आजारांशी संबंध असतो, ज्यात टाइप २ डायबिटीस आणि हृदयरोग यांचा समावेश आहे. या रिसर्चच्या लेखिका केंड्रा क्लॅग म्हणाल्या की, वेगवेगळ्या मायक्रोब्सच्या टेस्टनंतर आम्ही मायक्रोब्सला औषधीमध्ये बदलू शकतो आणि असे बॅक्टेरिया शोधू शकू जे वेगवेगळे आजार असलेल्या लोकांमध्ये कमी असू शकतात.
