Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तब्येत सुधरावी म्हणून तुम्हाला प्रोटीन पावडर खाण्याची खरंच गरज आहे का?

तब्येत सुधरावी म्हणून तुम्हाला प्रोटीन पावडर खाण्याची खरंच गरज आहे का?

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अनेकजण तब्येत कमावण्याचा निर्णय घेतात, प्रोटीन सप्लिमेण्टचा खुराक लावतात; पण आरोग्यावर अतिशय गंभीर दुष्परिणाम त्यानं होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 05:37 PM2024-01-10T17:37:18+5:302024-01-10T18:29:27+5:30

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अनेकजण तब्येत कमावण्याचा निर्णय घेतात, प्रोटीन सप्लिमेण्टचा खुराक लावतात; पण आरोग्यावर अतिशय गंभीर दुष्परिणाम त्यानं होऊ शकतो.

to build muscle and physical power taking protein powder? is protein powder is safe? effect of protein supplement | तब्येत सुधरावी म्हणून तुम्हाला प्रोटीन पावडर खाण्याची खरंच गरज आहे का?

तब्येत सुधरावी म्हणून तुम्हाला प्रोटीन पावडर खाण्याची खरंच गरज आहे का?

मंजिरी मंडलिक-कुलकर्णी


मार्केटिंग आणि बाजार यामुळे विविध प्रोटीन सप्लिमेंटचा पेव सध्या फुटले आहे. साध्या मेडिकल दुकानातही तुम्हाला वेगवेगळे प्रोटीन

सप्लिमेंट दिसतील. मग त्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटासाठी, लहान मुलांसाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे, मसल बिल्डिंग करणाऱ्या पुरुषांसाठी वेगळे, बाळंतपण झाल्यानंतर किंवा मेनोपॉज आल्यानंतर वेगळे असे कित्येक सप्लिमेंट्स तुम्हाला दिसतील. बाजारात मिळतात म्हणजे आपल्याला या प्रोटीन सप्लिमेंटची गरज आहे का हे सगळ्यात आधी प्रत्येकानं ओळखण्याची गरज आहे.

मग ही गरज कशी ओळखायची?

आपलं शरीर एका सामान्य तत्त्वानुसार चालतं ते म्हणजे शरीराला गरज असेल तरच आपण जे खातो त्याचा वापर होतो. आपल्या शरीरातील मसल्सला प्रोटीनची गरज असते मग आपण शरीरातले मसल्स तेवढेे वापरत आहोत का हे आधी बघायला हवे. मसल्स शक्यतो शारीरिक कष्ट आणि व्यायाम या दोनवेळा वापरले जातात. जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा नसाल, तुम्ही दिवसभर शारीरिक कष्ट करत असाल किंवा नसाल त्यावर हे उत्तर ठरते. तुम्ही तुमचे मसल्स वापरत आहात का ?

(Image : google)
 

जागतिक आरोग्य संस्थेनं सांगितल्याप्रमाणे १ ग्रॅम प्रोटीन परकिलो हे समीकरण व्यायाम करणाऱ्या शरीरासाठी आहे. जर तुमच्या मॉडरेट ॲक्टिव्हिटी असतील आणि दिवसभर बसून काम असेल तर या प्रोटीन सप्लिमेंटचा लोड तुमच्या लिव्हर आणि किडनीवरती येतो. त्यामुळे लिव्हर आणि किडनी डिसऑर्डर्स होण्याची शक्यता असते.
तसेच आजकाल वजन कमी करण्यासाठी किटो किंवा प्रोटीन रिच डाएट घेण्याचे फॅड आले आहे. विविध प्रकारचे सेक्स आणि प्रॉडक्ट्स यामध्येसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आयसोलेटेड म्हणजेच सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये प्रोटीन असतात.

प्रोटीन हवं तरी किती नेमकं?

१. आहार तज्ज्ञ म्हणून मला विचाराल तर कधीही कुठलेही सप्लिमेंट प्रॉडक्ट रेकमेंड करणार नाही. तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, ॲथलिट असाल तरीसुद्धा रोजची प्रोटीन रिक्वायरमेंट आहारातूनच पूर्ण करायची तरच शरीर ते पूर्णतः उपयोगात आणते आणि त्याचा शरीरावर लोड येत नाही.
२. आपल्या शरीराला अन्नाची सवय असते जोपर्यंत तुमच्या रक्तामध्ये प्रोटीनची कमतरता येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंटची गरज नाही.
३. रोज घेतलेल्या आहारात जर तुम्ही प्रोटीनची कमतरता भरून काढलीत तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही.

(Image : google)
 

४. आपल्या शरीराला अन्नाची म्हणजेच कॉम्प्लेक्स गोष्टींची सवय असते आपण कुठल्याही अन्नातून प्युअर प्रोटीन घेत नाही, त्याच्यासोबत इतर गोष्टी जोडलेल्या असतात जसे की आपण वरण-भात खातो तेव्हा त्यामध्ये प्रोटीन्स फॅट्स कार्बोहायड्रेट हे सगळं एकत्रित एकमेकांना जोडलेले असतात आणि अशा गोष्टींची सवय असल्यामुळे आपले लिव्हर हवं तेवढंच प्रोटीन त्यातून काढून घेतं.
५. मग जर तुम्ही प्युअर फॉर्ममध्ये प्रोटीन दिलं तर हे लिव्हरसाठी सरप्राईज असतं तरी सुरुवातीला लिव्हर लागेल तेवढे प्रोटीन्स घेते आणि बाकीच्या उरलेल्या प्रोटीनचा लोड किडनीवरती सोडते.
६. त्यामुळे अन्नातून जर तुम्ही प्रोटीनची कमतरता भरून काढली तरच तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो.


७. अन्नातून प्रोटीनची कमतरता भरून निघत नसेल तरच सप्लिमेंट घेण्याचा विचार करत असाल तर आधी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. मनानेच विकत आणून घेऊ नका.
८. अनेक ॲथलिट, टेनिस-क्रिकेट खेळाडू, आयर्न मॅन, कॉम्रेड रनर्स ही माझ्याकडे आहारसल्ला घ्यायला येतात. त्यांना मी कधीही सप्लिमेंट्री प्रोटीन्स घेण्याचा सल्ला देत नाही. आहार सांभाळतात आणि त्यांचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला आहे. त्यामुळे प्रोटीनचे डबे विकत आणून खुराक लावण्यापूर्वी आपण नक्की काय करतो आहोत याचा विचार करा!

 

(लेखिका आहार तज्ज्ञ आहेत.)
durvamanjiri@gmail.com

Web Title: to build muscle and physical power taking protein powder? is protein powder is safe? effect of protein supplement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.