बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री 'तमन्ना भाटिया' नेहमीच तिच्या (Tamannaah Bhatia) फिटनेस व लूकमुळे चर्चेत असते. आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांची मने जिंकणारी तमन्ना भाटिया आज 'फिटनेस आयकॉन' म्हणूनही ओळखली जाते. काही काळापूर्वी तिच्या वजन वाढीबद्दल चांगलीच चर्चा झाली होती, पण तमन्नाने आपल्या मेहनतीने आणि योग्य डाएट प्लॅनने फक्त वजन (Tamannaah Bhatias Fitness Trainer Shared 3 Weight Loss Tips) कमी केलं नाही, तर स्वतःला एकदम टोन्ड आणि एनर्जेटिक बनवलं. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशननं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
अनेकदा चित्रपटांच्या भूमिकेनुसार किंवा वैयक्तिक फिटनेससाठी ती तिच्या शरीरामध्ये आवश्यक बदल करते. तिची चमकदार त्वचा आणि सुडौल बांधा केवळ योगा किंवा जीममध्ये घाम गाळल्याने नव्हे, तर शिस्तबद्ध आहार आणि अचूक लाईफस्टाईलमुळे टिकून आहे. आपल्यापैकी अनेकींना तिची टोन्ड फिगर आणि उत्तम (Tamannaah Bhatia's fitness trainer and his weight loss tips) फिटनेसच सिक्रेट नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा असेल. तर वेटलॉससाठी तमन्नाने तिचे डाएट, वर्कआऊट्स आणि लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल केले, ज्यामुळे तिने यशस्वीरित्या वजन कमी केले आणि स्वतःला अधिक फिट ठेवले ते पाहूयात.
तमन्ना भाटियाचे वेटलॉस सिक्रेट आहे खास...
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे वजन काही काळापूर्वी वाढले होते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने तिचे फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जलद गतीने वजन कमी करून आपली फिगर पुन्हा स्लिमट्रिम केली. तमन्नाचे फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह वजन कमी करण्याच्या ३ खास टिप्स देत आहेत, ज्या दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन कमी करण्यात मदत करतील. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, तमन्ना भाटियाचे फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी सांगितले की, अनेकदा आपले वजन कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढते. कारण आपल्या ३ सवयी आपण कायमस्वरूपी सुधारत नाहीत. सिद्धार्थ सिंह सांगतात की, जर तुम्ही योग्य आहार आणि व्यायामासोबत काही गोष्टींची काळजी घेतली, तर तुम्ही ९० दिवसांत ५ ते १० किलो वजन सहजपणे कमी करू शकता.
१. प्रोटीनचे प्रमाण वाढवा :- वेट लॉससाठी प्रोटीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे अनावश्यक कॅलरी खाणे टाळले जाते. डाळी, पनीर यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रोटीनमुळे स्नायूंची वाढ होते, जे चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते. तमन्नाच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले की, तुम्ही तुमच्या प्रत्येक आहारात प्रथिनांचे चांगले स्रोत खाल्लेच पाहिजेत.
२. हायड्रेशन :- ट्रेनरने सांगितले की, अनेकदा आपण पाण्याच्या तहानलेला भूक समजतो. अशावेळी, खाल्ल्यामुळे शरीरात जास्त कॅलरीज जातात आणि वजन वाढते. जेव्हा तुम्हाला दोन जेवणांच्यामध्ये भूक लागेल, तेव्हा एक ग्लास पाणी प्या. यामुळे तुमचे क्रेविंग्स शांत होईल आणि तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.
३. नियमित व्यायाम करा :- ट्रेनरने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. व्यायाम केल्याने कॅलरी जळतात आणि शरीर सुडौल होते. याशिवाय, एक्सरसाइज तुमचा मूड सुधारतो आणि मेंदूचे कार्य अधिक सुरळीत करण्यास मदत करतो.
गॅस-ॲसिडीटी सतावते झोपेचं होत खोबरं? 'या' पोझिशनमध्ये झोपा, गॅसचा त्रास होईल मिनिटांत कमी...
४. पुरेशी झोप घ्या :- वजन कमी करण्याच्या प्रवासात उत्तम आणि पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे शरीर पुरेशी विश्रांती घेत नाही, तेव्हा शरीरात कोर्टिसोल (Cortisol) नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते. हे हार्मोन वाढलेले वजन कमी होऊ देत नाही आणि फॅट साठवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दररोज ७ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे.
५. जेवण आणि व्यायामाची वेळ निश्चित करा :- शरीराचे एक विशिष्ट वेळापत्रक असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणाची वेळ आणि व्यायामाची वेळ निश्चित करणे फार महत्त्वाचे आहे. दररोज त्याच वेळेला जेवण आणि व्यायाम केल्याने, तुमच्या शरीराची चयापचय क्रिया योग्य रीतीने होते, ज्यामुळे कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.