प्रोटीन्स हा शरीरासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक. शरीरात प्रोटीन्सची कमतरता असेल तर खूप थकवा येतो. स्नायूंमध्ये त्रास जाणवतो. गळून गेल्यासारखं होतं. याशिवाय केस गळतात, हाताची नखं लगेच तुटतात. चेहराही निस्तेज दिसायला लागतो. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत जाते. तज्ज्ञांच्या मते आपल्या शरीराला एका दिवशी किती प्रोटीन्सची गरज आहे हे ओळखायचं असेल तर आपल्या वजनानुसार त्याचा अंदाज काढावा. म्हणजेच आपल्या शरीराच्या प्रत्येक १ किलो वजनामागे ०.८ ते १ ग्रॅम एवढं प्रोटीन आपल्याला गरजेचं असतं (super food for proteins). जे लोक नियमितपणे हार्ड वर्कआऊट करतात किंवा ज्यांना शारिरीक मेहनत जास्त असते त्यांची प्रोटीन्सची गरज जास्त असते (how to get rid of protein deficiency?). बऱ्याच शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. ती कशी भरून काढायची ते पाहा..(protein rich food)
शाकाहारी लोकांच्या शरीरातली प्रोटीन्सची कमतरता कशी भरून काढावी?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मते जर शाकाहारी लोकांनी वेगवेगळ्या डाळी, राजमा, चणे, मुग किंवा मुगाची डाळ दररोज त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात घेतले तर त्यांच्या शरीरातली प्रोटीन्सची कमतरता लवकर भरून निघू शकते.
तुम्हीही धान्य साठविण्यासाठी केमिकलयुक्त पावडर वापरता? मग हे तातडीने वाचा- तज्ज्ञ सांगतात धोके..
त्यासाठी आठवड्यातून ३ ते ४ दिवस वेगवेगळ्या कडधान्यांच्या उसळी खाव्या.
यासोबतच पनीर, दूध, दही यासारखे पदार्थही नियमितपणे खायला हवे.
बेसनाचे पीठ, सातुचे पीठ, नाचणी, ज्वारी हे पदार्थही भरपूर प्रोटीन्स देतात. त्यामुळे बेसनाचे धिरडे, पिठलं, सातू- नाचणी- बेसन एकत्र करून त्यांचे थालिपीठ करणे किंवा पराठे करणे, नाचणीच्या इडल्या, डोसे , ज्वारीच्या भाकरी यापैकी एखादा पदार्थ नियमितपणे खाल्ल्यासही पुरेसे प्रोटीन्स मिळू शकतात.
मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स
डॉ. भारद्वाज यांनी एनडीटीव्ही लाईफस्टाईलला दिलेल्या माहितीनुसार प्लांट बेस प्रोटीन्समध्ये काही महत्त्वाच्या अमिनो ॲसिडची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी योग्य पद्धतीने प्रोटीन्स खाणं गरजेचं असतं. त्यासाठी वरणासोबत थोडा भात, पराठ्यांसोबत दही, कडधान्यांसोबत भाकरी किंवा भात या पद्धतीने दोन पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास अधिक चांगले.