Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज सकाळी उठताच 'हे' काम करा, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वय वाढलं तरी त्वचा राहील सुंदर

रोज सकाळी उठताच 'हे' काम करा, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वय वाढलं तरी त्वचा राहील सुंदर

Summer Special Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत खूप गळून गेल्यासारखं होतं. असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे ते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 13:14 IST2026-03-10T13:13:31+5:302026-03-10T13:14:16+5:30

Summer Special Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत खूप गळून गेल्यासारखं होतं. असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे ते पाहूया...

Summer Special Health Tips, Do this every morning as soon as you wake up, you will stay energetic all day long, your skin will remain beautiful even as you age. | रोज सकाळी उठताच 'हे' काम करा, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वय वाढलं तरी त्वचा राहील सुंदर

रोज सकाळी उठताच 'हे' काम करा, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वय वाढलं तरी त्वचा राहील सुंदर

Highlights तब्येत तर चांगली होईलच, पण केस आणि त्वचाही नेहमीच सुंदर राहील. वय झालं तरी त्वचेवरचा ग्लो कमी होणार नाही...

मार्च महिना सुरू झाला आणि सगळीकडे उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. आताच एवढं ऊन तर पुढे एप्रिल, मे महिन्यात कसं होणार अशी चिंता सगळ्यांनाच आहे. ऊन वाढलं की आपोआपच अंगातली ताकद कमी झाल्यासारखी वाटते. कारण या दिवसांत डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि दुसरं म्हणजे जेवण कमी होतं. त्यामुळे मग शरीरात अनेक पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. गळून गेल्यासारखं वाटतं. अशक्तपणा येतो. हे सगळं टाळायचं असेल आणि उन्हाळ्यातही एकदम फ्रेश आणि एनर्जेटीक राहायचं असेल तर पुढे सांगितलेलं एक सोपं काम रोज सकाळी नेमाने करा..

 

उन्हाळ्यात एनर्जेटीक राहण्यासाठी सगळ्यांनीच करावा 'हा' उपाय

उन्हाळ्यात अशक्तपणा येऊ नये, यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dt.lavleen या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये आहारतज्ज्ञ सांगतात की रोज रात्री झोपण्यापुर्वी १ चमचा भोपळ्याच्या बिया, १ चमचा कलिंगडाच्या बिया आणि अर्धा चमचा खसखस पाण्यामध्ये भिजत घाला.

फक्त २ गोष्टी करा, कुणालाही सहज कमी करता येईल २० किलो वजन - एका महिन्यात दिसेल फरक

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपोटी या बिया बारीक चावून खा. लोहाची कमतरता भरून येण्यासाठी तुम्ही यामध्ये काळ्या मनुकाही घालू शकता. हा उपाय जर रोज सकाळी केला तर शरीरातल्या कित्येक पौष्टिक घटकांची, व्हिटॅमिन्सची कमतरता भरून निघेल. यामुळे तब्येत तर चांगली होईलच, पण केस आणि त्वचाही नेहमीच सुंदर राहील. वय झालं तरी त्वचेवरचा ग्लो कमी होणार नाही...


 

उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून या गोष्टीही करा...

१. भरपूर पाणी प्या. शिवाय ताक, लिंबू पाणी, कोकम सरबत, कैरीचं पन्हं अशी पारंपरिक पेयं या दिवसांत जास्त प्रमाणात घ्या. यामुळे डिहायड्रेशन होत नाही. 

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आजपासून तातडीने करा ५ गोष्टी

२. शरीरातली पाणी पातळी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी असणारी फळं खायला हवीत. त्यासाठी काकडी, कलिंगड, खरबूज चांगल्या प्रमाणात खा. यामुळे डिहायड्रेशनही होत नाही आणि शरीराला आवश्यक ती खनिजे, व्हिटॅमिन्सही मिळतात. 

३. हलका- फुलका आहार घ्या. मसालेदार, तेलकट, तुपकट पदार्थ खाणं टाळा. 


 

Web Title : ऊर्जा और चमकती त्वचा के लिए सुबह की दिनचर्या।

Web Summary : इस आसान सुबह की दिनचर्या से गर्मी को मात दें! कद्दू, तरबूज के बीज और खसखस को रात भर भिगो दें। निरंतर ऊर्जा, पोषक तत्वों की पूर्ति और चमकदार त्वचा के लिए इन्हें खाली पेट खाएं। पारंपरिक पेय और पानी वाले फलों से हाइड्रेटेड रहें।

Web Title : Morning routine for energy, glowing skin even with age.

Web Summary : Beat the summer heat with this simple morning routine! Soak pumpkin, watermelon seeds, and poppy seeds overnight. Eat them on an empty stomach for sustained energy, nutrient replenishment, and radiant skin. Stay hydrated with traditional drinks and watery fruits.