Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वेटलॉससाठी खास घरगुती नॅचरल ड्रिंक, रोज १ मिनिटाचं काम-झटकाल अंगावरचा मेद अगदी चटकन

वेटलॉससाठी खास घरगुती नॅचरल ड्रिंक, रोज १ मिनिटाचं काम-झटकाल अंगावरचा मेद अगदी चटकन

Special homemade natural drink for weight loss, 1 minute of work every day - body fat will be reduced very quickly try this recipe : वजन कमी करण्यासाठी खास ड्रिंक. एकदा धणे-जिऱ्याचे पाणी पिऊन तर पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 18:51 IST2025-06-18T18:48:54+5:302025-06-18T18:51:24+5:30

Special homemade natural drink for weight loss, 1 minute of work every day - body fat will be reduced very quickly try this recipe : वजन कमी करण्यासाठी खास ड्रिंक. एकदा धणे-जिऱ्याचे पाणी पिऊन तर पाहा.

Special homemade natural drink for weight loss, 1 minute of work every day - body fat will be reduced very quickly try this recipe | वेटलॉससाठी खास घरगुती नॅचरल ड्रिंक, रोज १ मिनिटाचं काम-झटकाल अंगावरचा मेद अगदी चटकन

वेटलॉससाठी खास घरगुती नॅचरल ड्रिंक, रोज १ मिनिटाचं काम-झटकाल अंगावरचा मेद अगदी चटकन

आपण बरेचदा झटपट वजन कमी करा असे सांगणार्‍या जाहिराती पाहतो. त्यात कोणते तरी पेय असते. मग कंपनी असा दावा करते की हे ड्रिंक रोज प्या महिन्याभरात पाच किलो वजन कमी होईल. अनेक जण अशा जाहिरातींना भुलतात. (Special homemade natural drink for weight loss, 1 minute of work every day - body fat will be reduced very quickly try this recipe )असे एखादे पेय पिऊन वजन कमी होत नाही. शरीराला कष्ट घ्यावेच लागतात. व्यायाम करावाच लागतो आणि इतरही काही उपाय करावे लागतात. आहारावर लक्ष द्यावे लागते. झटपट वजन कमी करणारी पेये जरी नसली तरी पण अशी काही पेये जी वजन कमी करण्यासाठी मदत करतात. रोज नियमित ठरल्या वेळी प्यायल्यावर शरीरासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.    

महागातले विकतचे वेटलॉस ड्रिंक्स विकत घेण्यापेक्षा घरीच काही ठराविक पदार्थांचा वापर करुन छान वेटलॉस ड्रिंक तयार करता येते. त्यासाठी फार काही कष्टही घ्यायला लागणार नाहीत. वर्षानुवर्षे चालत आलेले असेच एक वेटलॉस ड्रिंक म्हणजे धणे- जिऱ्याचं पाणी. करायला अगदीच सोपं आहे. चवीलाही वाईट नसते. तोंड वेडंवाकडं करत कडू काही प्यायची गरज नाही. हे एक पेय दिवसातून किमान दोनदा प्या. नक्की उपयोग होईल. मात्र फक्त हे पाणी पिऊन उपयोग नाही त्या सोबत व्यायाम आणि योग्य आहारही गरजेचा आहे.

धणे आणि जिरे दोन्ही पचनासाठी अतिउत्तम आहेत. त्यामुळे आहारात रोज जिऱ्याचा वापर केला जातो. फोडणीत जिरे घातले जाते जेणेकरुन पदार्थ बाधणार नाहीत आणि चटकन जिरतील. तसेच वातामुळे, गॅसमुळे फुगलेले पोट पुन्हा की करण्यासाठी हे पाणी फायद्याचे ठरते. अडकलेले व साठलेले गॅस मोकळे होतात. पचन छान झाल्यावर वजनही कमी होते आणि पोटाला आधारही मिळतो. 

साहित्य 
धणे, जिरे, पाणी

कृती
१. वाटीभर धणे घ्यायचे. तसेच वाटीभर जिरे घ्यायचे. दोन्ही छान परतायचे. तेल, तूप, पाणी काहीही लागू न देता परतून घ्यायचे. 

२. मिक्सरमध्ये दोन्ही पदार्थ एकत्र करायचे आणि त्याची पूड वाटून घ्यायची. सरसरीत वाटायची. एका हवाबंद डब्यात साठवून ठेवायची. 

३. एका पातेल्यात दोन ग्लास भरुन पाणी घ्यायचे. त्यात चमचाभर धणे-जिरे पूड घालायची आणि पाणी आटवून एक ग्लास करायचे. असे पाणी रोज सकाळी प्यायचे. संध्याकाळीसुद्धा पिऊ शकता.   

Web Title: Special homemade natural drink for weight loss, 1 minute of work every day - body fat will be reduced very quickly try this recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.