Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलंय- वजनही वाढलं? जेवण झाल्यानंतर 'हे' काम करून पाणी प्या, झरझर वजन उतरेल

पोट सुटलंय- वजनही वाढलं? जेवण झाल्यानंतर 'हे' काम करून पाणी प्या, झरझर वजन उतरेल

Simple Home Hacks For Fast Weight Loss: वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट झटपट कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(simple and easy trick to reduce belly fat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2025 17:40 IST2025-06-28T17:39:39+5:302025-06-28T17:40:21+5:30

Simple Home Hacks For Fast Weight Loss: वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट झटपट कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(simple and easy trick to reduce belly fat)

simple home hacks for fast weight loss, how to reduce weight quickly, simple and easy trick to reduce belly fat | पोट सुटलंय- वजनही वाढलं? जेवण झाल्यानंतर 'हे' काम करून पाणी प्या, झरझर वजन उतरेल

पोट सुटलंय- वजनही वाढलं? जेवण झाल्यानंतर 'हे' काम करून पाणी प्या, झरझर वजन उतरेल

Highlightsहा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास पचनक्रिया आणि चयापचय क्रिया अधिक चांगली होऊन पोटावरची चरबी झटपट कमी होण्यास मदत होईल.

सध्या वाढत्या वजनाची चिंता अनेकांना भेडसावते आहे. वजन वाढल्याने आपल्या शरीराचा आकार बिघडून आपण बेढब तर दिसतोच, पण त्यासोबतच इतरही अनेक आजार आपल्या मागे कमी वयातच लागतात. बहुतांश आजार टाळायचे असतील तर वजन नियंत्रित ठेवणे हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे, असं तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. वजन आणि पोट कमी करायचे तर व्यायाम आणि डाएट नियमितपणे करणे गरजेचे आहे (simple and easy trick to reduce belly fat). पण अनेकांना व्यायामासाठी वेळ नसतो. किंवा वेळ असला तरी व्यायामाचा कंटाळा येतो. डाएट पाळणं होत नाही (how to reduce weight quickly?). अशावेळी वजन कमी कसं करावं किंवा पोटावरची चरबी कशी कमी करावी, असा प्रश्न पडला असेल तर तज्ज्ञांनी सुचविलेला हा उपाय लगेचच करून पाहा..(simple home hacks for fast weight loss)

 

वजन आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय

वजन आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती sehatmantarna या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यासाठी एक सोपा उपाय सुचविण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी बडिशेप, जिरे आणि ओवा हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घ्या आणि तव्यावर थोडेसे भाजून काढा.

अविवाहित महिलांनाही मिळू शकते का मॅटर्निटी लिव्ह? कायदा नेमकं काय सांगतो?

ते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्या. जेवण झाल्यानंतर १५ मिनिटांनी ही चिमूटभर पावडर तोंडात टाका आणि अगदी सावकाशपणे चघळत खा. यानंतर मग पाणी प्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास पचनक्रिया आणि चयापचय क्रिया अधिक चांगली होऊन पोटावरची चरबी झटपट कमी होण्यास मदत होईल.

 

त्यासोबतच हे उपायही करा...

१. दिवसाची सुरवात लिंबू पिळलेलं गरम पाणी पिऊन करा.

२. साखर, गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा.

३. रोज अर्धा तास कोणता ना कोणता व्यायाम करा.

फक्त १० रुपयांत होणारा घरगुती उपाय, फर्निचर वर्षांनुवर्षे राहील नव्यासारखं, वाळवी लागण्याचं टेन्शनच नाही

४. रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ च्या आधी घ्या.

५. ७ ते ८ ग्लास पाणी दररोज प्या.

६. फायबर, प्रोटीन्स आहारात योग्य प्रमाणात असतील याकडे लक्ष द्या.

७. रात्रीची झोप ७ ते ८ तासांची व्हायलाच हवी. 


 

Web Title: simple home hacks for fast weight loss, how to reduce weight quickly, simple and easy trick to reduce belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.